पुणे : नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी २२ एप्रिल २०२६ रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नवी मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 22 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई
– वयोमर्यादा : खुला 38 वर्ष आणि राखीव 43 वर्ष.
– मासिक ठोक वेतन / मानधन : वैद्यकीय अधिकारी : 40000
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : २२ एप्रिल २०२६
– मुलाखतीची पत्ता : आरोग्य विभाग, 3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी www.nmmc.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


