Today सोमवार, 15th जून 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Cough Syrup Case: विषारी ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक; औषध प्यायल्याने 20 मुलांचा मृत्यू

Cough Syrup Case: विषारी ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक; औषध प्यायल्याने 20 मुलांचा मृत्यू

नवी दिल्ली: मध्य प्रदेशात विषारी कफ सिरप प्यायल्याने किडनी निकामी होऊन 20 मुलांच मृत्यू झाला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. मोठी कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या विशेष तपास पथकाने विषारी कफ सिरपकोल्ड्रिफबनवणारी कंपनी श्रीसन फार्माचा मालक रंगनाथन गोविंदन याला अटक केली आहे. पोलिसांनी रंगनाथनला शोधण्यासाठी 20,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

विषारी कफ सिरपचे प्रकरण समोर आल्यापासून रंगनाथन गोविंदन याने चेन्नईतील त्यांच्या घराला आणि तामिळनाडूतील कांचीपुरम येथील त्यांच्या कारखान्याला कुलूप लावले होते. याचबरोबर तो पत्नीसह फरार झाला होता. विषारी कफ सिरप कोल्ड्रिफ प्यायल्याने 20 मुलांच्या मृत्यूनंतर, 5 ऑक्टोबर रोजी छिंदवाडा येथील पारसिया पोलिस ठाण्यात औषध कंपनी श्रीसन फार्माचे संचालक, बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण सोनी आणि इतर जबाबदार व्यक्तींविरुद्ध बीएनएसच्या कलम 105, 206 आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायदा 1940 च्या कलम 27 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटी टीम रंगनाथनला चेन्नईहून भोपाळला आणत आहे, जिथे कफ सिरपचे उत्पादन, कच्च्या मालाचा पुरवठा, वितरण नेटवर्क आणि परवाना यातील अनियमिततेबद्दल चौकशी केली जाईल. सिरपमध्ये हे घातक रसायन कसे समाविष्ट झाले आणि कंपनीच्या गुणवत्ता तपासणी प्रक्रिया इतक्या गंभीरपणे चुकीच्या का होत्या हे शोधण्यासाठी तपास संस्था काम करत आहेत.

मुलांच्या मृत्यूमुळे उडाला गोंधळ!

मध्य प्रदेशात कोल्ड्रिफ नावाच्या कफ सिरपमुळे 20 मुलांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात संताप आणि घबराट पसरली. आरोग्य विभागाने तात्काळ या औषधाच्या विक्रीवर बंदी घातली, कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल केला आणि चौकशी सुरू केली. या घटनेमुळे राज्यातील औषधांच्या सुरक्षिततेच्या मानकांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!