Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Phaltan Murder Case: फलटण हादरलं! महिलेने पती आणि दुसऱ्या प्रियकरासोबत मिळून पहिल्या बॉयफ्रेंडचा काढला काटा; मृतदेहाचे तुकडे केलं अन्…

Phaltan Murder Case: फलटण हादरलं! महिलेने पती आणि दुसऱ्या प्रियकरासोबत मिळून पहिल्या बॉयफ्रेंडचा काढला काटा; मृतदेहाचे तुकडे केलं अन्…

Phaltan Murder Case : एखाद्या थरारपटालाही लाजवेल अशा क्रूर हत्येच्या घटनेने सातारा जिल्हा सुन्न झाला आहे. फलटण तालुक्यात एका तरुणाचा काटा काढण्यासाठी त्याची प्रेयसी, तिचा पती आणि तिचाच दुसरा प्रियकर एकत्र आल्याचे समोर आले आहे. आरोपींनी केवळ सतीशची हत्याच केली नाही, तर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावताना क्रूरतेची सीमा ओलांडली.

प्रेमाचा त्रिकोण आणि हत्येचं कारस्थान

सोमंथळीचा रहिवासी असलेला सतीश उर्फ आप्पा गडस हा १४ जानेवारीपासून गायब होता. पोलिसांनी त्याच्या बेपत्ता प्रकरणाचा छडा लावला असता धक्कादायक वास्तव समोर आले. सतीशचे एका विवाहित महिलेशी संबंध होते, मात्र त्याच महिलेचे सतीश माने नावाच्या दुसऱ्या तरुणाशीही प्रेमसंबंध होते. सतीश गडस हा लग्नासाठी किंवा अन्य कारणाने त्या महिलेवर दबाव टाकत असल्याने, त्याला कायमचे संपवण्याचा कट रचण्यात आला.

मकरसंक्रांतीच्या दिवशीच केला ‘काटा’

१४ जानेवारीला मकरसंक्रांतीच्या सणादिवशीच हा रक्तरंजित खेळ खेळला गेला. वादावादी झाल्यानंतर आरोपींनी प्रथम सतीशला लोखंडी रॉडने मारून जखमी केले. त्यानंतर ‘तुला दवाखान्यात नेतो’ असे भासवून त्याला कारमध्ये बसवले. मात्र, त्याला रुग्णालयात न नेता विडणी परिसरातील एका ओसाड माळरानावर नेऊन डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.

हेही वाचा – Crime News : ताम्हिणी घाटात पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची निर्घृण हत्या

विद्युत यंत्राने शरीराचे तुकडे

या हत्येतील सर्वात भीषण भाग म्हणजे मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची पद्धत. आरोपींनी सतीशच्या मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या इलेक्ट्रिक मशीनने तुकडे केले. हे अवशेष दोन पोत्यात भरून एक पोते नीरा नदीच्या पात्रात, तर दुसरे पोते साठे गावातील तलावात फेकून दिले.

पोलिसी खाक्या मिळताच आरोपींची कबुली

दरम्यान, २१ जानेवारीला सतीशच्या भावाने तक्रार दिल्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. सुरुवातीला पोलिसांना गुंगारा देणाऱ्या संशयित महिलेचा पती लखन बुधावले आणि प्रियकर सतीश माने यांनी पोलिसी खाक्या मिळताच गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणी तिन्ही मुख्य सूत्रधारांना अटक केली असून, नदीपात्रात सतीशच्या शरीराचे अवशेष शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!