Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nakabandi in Pune: मध्यरात्री पुण्याच्या 7 सीमा सील! हातात आधुनिक शस्त्रे घेऊन पोलीस सज्ज; शहरात काहीतरी मोठं घडतंय?

Nakabandi in Pune: मध्यरात्री पुण्याच्या 7 सीमा सील! हातात आधुनिक शस्त्रे घेऊन पोलीस सज्ज; शहरात काहीतरी मोठं घडतंय?

Nakabandi in Pune: पुणे शहरातील रस्त्यांवरील गुन्हेगारीला (Street Crime) पूर्णपणे ठेचण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक पावले उचलली आहेत. शहराच्या वेशीवर असलेल्या ७ प्रमुख एन्ट्री पॉईंट्सवर आता पोलिसांनी अभेद्य तटबंदी उभारली असून, येथे आधुनिक शस्त्रास्त्रांसह ‘सशस्त्र’ पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

पुण्याच्या या ७ मार्गांवर कडक तपासणी
शहरात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी खालील सात महत्त्वाचे नाके निश्चित करण्यात आले आहेत:

  • सातारा रस्ता
  • बाणेर रस्ता
  • सोलापूर रस्ता
  • जुना पुणे-मुंबई महामार्ग
  • नगर रस्ता
  • सिंहगड रस्ता
  • सासवड रस्ता

अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह ‘हाय-अलर्ट’
या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नाकाबंदीच्या ठिकाणी असलेले पोलीस केवळ लाठीधारी नसून ते ९ एमएम कार्बाइन गन, पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर यांसारख्या आधुनिक शस्त्रांनी सज्ज असतील. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करणे आणि संशयास्पद वाहनांना जागेवरच रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

नाकाबंदीचे स्वरूप आणि कार्यपद्धती:

  • अधिकारी तैनात: प्रत्येक पॉईंटवर एक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचे पथक तैनात असेल.
  • निवडक तपासणी: सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सर्व वाहने न थांबवता, केवळ संशयास्पद वाहनांची आणि व्यक्तींची कसून झडती घेतली जाईल.
  • वेळ आणि रिपोर्टिंग: दररोज रात्री ठराविक वेळेत ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेचा दैनंदिन अहवाल थेट पोलीस उपायुक्तांना (DCP) सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शहरातील सुरक्षिततेसाठी आम्ही सात संवेदनशील नाके निवडले आहेत. परिस्थितीनुसार या नाक्यांच्या संख्येत किंवा ठिकाणी बदल केले जातील, मात्र गुन्हेगारीवर वचक बसवणे हेच आमचे प्राधान्य आहे, असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.

नागरिकांसाठी आवाहन

प्रवासादरम्यान सोबत ओळखपत्र आणि वाहनाची आवश्यक कागदपत्रे ठेवावीत, जेणेकरून तपासणी दरम्यान कोणताही अडथळा येणार नाही. पुण्याच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी उचललेल्या या पावलामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना अधिक सुरक्षित वाटण्यास मदत होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!