Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sunetra Pawar : राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद वाढला; सुनेत्रा पवार यांनी घेतला महत्वाचा निर्णय

Sunetra Pawar : राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद वाढला; सुनेत्रा पवार यांनी घेतला महत्वाचा निर्णय

Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत नाराजी आणि विसंवादाच्या पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवार यांनी महत्त्वाची भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून निर्माण झालेल्या वादानंतर त्यांनी वरिष्ठ नेत्यांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.

कार्यकारिणीच्या यादीवरून नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या पत्रात काही प्रमुख नेत्यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने पक्षात नाराजी निर्माण झाली.

खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख नव्हता, तर इतर काही राज्यांच्या अध्यक्षांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे तटकरे नाराज असल्याची चर्चा रंगली. त्याचवेळी प्रफुल पटेल यांनाही पक्षात डावलले जात असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

तटकरे यांची शरद पवारांशी भेट

या घडामोडींनंतर सुनील तटकरे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले असले तरी, राजकीय चर्चांना उधाण आले. यानंतर शरद पवार यांनी तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या क्षमतेचे कौतुक करत त्यांच्या भूमिकेबाबत निर्णय घेणे हे सध्याच्या नेतृत्वाचे अधिकार असल्याचे म्हटले.

सुनेत्रा पवारांचे डॅमेज कंट्रोल सुरू

पक्षातील वाढत्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लवकरच पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे.

पक्षात दोन गट सक्रिय?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या दोन गट असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. काही आमदार सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या बाजूने असल्याचे बोलले जाते, तर दुसरा गट सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना समर्थन देत असल्याचे सांगितले जात आहे.

पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीला सुनेत्रा पवार यांचे समर्थन असल्यामुळेच पक्षात अस्वस्थता वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शरद पवारांकडे तक्रारी?

दरम्यान, पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने पार्थ पवार यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी शरद पवारांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींना आणखी वेग आला आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!