Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rupali Chakankar : रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ! SIT नंतर आता ED चे समन्स; भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी कारवाईचा फास आवळला

Rupali Chakankar : रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ! SIT नंतर आता ED चे समन्स; भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी कारवाईचा फास आवळला

Rupali Chakankar ED Inquiry : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कालच एसआयटीने (SIT) त्यांची ६ तास कसून चौकशी केल्यानंतर, आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांना समन्स बजावले आहे.

मनी लॉन्ड्रिंगचा संशय; ईडीच्या रडारवर चाकणकर
अशोक खरात प्रकरणातील संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगच्या कोनातून ‘ईडी’ आता तपास करणार आहे. याच आठवड्यात चाकणकर यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी याच प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्या बहिणीचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी कालच चाकणकर यांची प्रदीर्घ चौकशी केली होती, त्यापाठोपाठ आता केंद्रीय यंत्रणेने चौकशीचा ससेमिरा लावल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

कल्पना खरात यांचा जामीन अर्ज लटकला
दुसरीकडे, अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात यांच्यावरही अटकेची टांगती तलवार कायम आहे. शिर्डी येथील जमीन फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारी प्रकरणात कल्पना खरात यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने या अर्जावरील सुनावणी तहकूब केली आहे. आता या प्रकरणावर मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात (२५ मे ते ३० मे दरम्यान) सुनावणी होण्याची शक्यता आहे. रूपाली चाकणकर यांना ईडीने बजावलेल्या समन्समुळे आता या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!