Today रविवार, 26th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: पुण्यात वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण; धातूच्या कड्याने त्यांच्या डोक्यावर हल्ला

Pune Crime: पुण्यात वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण; धातूच्या कड्याने त्यांच्या डोक्यावर हल्ला

पुणे: पुणे शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याने जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी पोलिसांवर मोठा ताण पडला आहे. सामान्य नागरिक गुन्हेगारांमुळे मोठे चिंतेत आहेत. गुन्हेगार आता सामान्य नागरिकांबरोबरच पोलिसांनाही लक्ष्य करत आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी एका पोलिसाला मारहाण झाली. त्यामुळे गुन्हेगारांची वाढती मजल मोडीत काढण्याचे मोठे आव्हान आता पोलीसांसमोर आहे.

मार्केट यार्ड परिसरात पुन्हा अशीच घटना घडली. वाहतूक नियंत्रण करत असताना हवालदारावर ट्रक चालक व त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघांना अटक केली आहे.

अटक केलेल्यांमध्ये सुमीत सुभाष सरकटे, अक्षय नानासाहेब शिंदे आणि मनजीत सुभाष कांबळे यांचा नावाचा समावेश आहेत. या प्रकरणात हवालदार महेश सुभाष साळुंखे यांनी फिर्याद दाखल केली असून ते बंडगार्डन पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. 17) रात्री साडेदहाच्या सुमारास हवालदार साळुंखे हे ड्युटी संपवून घरी जात होते. त्यावेळी मार्केट यार्डातील वखार महामंडळ चौकाजवळून एक ट्रक प्रचंड वेगाने जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अपघात होण्याची शक्यता ओळखून त्यांनी तत्परतेने ट्रकला प्रवेशद्वार क्रमांक 9 जवळ अडवले.

त्या वेळी आसपासच्या नागरिकांनी चालकाला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र साळुंखे यांनी हस्तक्षेप करून जमावाला शांत केले. यानंतर ट्रकचालकाने आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. काही वेळातच आरोपींनी साळुंखे यांच्यावर हल्ला चढवला. हातातील धातूच्या कड्याने त्यांच्या डोक्यावर मारहण केली. जखमी अवस्थेतही साळुंखे यांनी तत्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!