Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

गोकुळ ‘डिबेंचर’ वाद पुन्हा शिगेला! जावयाचा ठेका रद्द का केला नाही? महाडिक गटाचा सतेज पाटील यांना थेट सवाल

गोकुळ ‘डिबेंचर’ वाद पुन्हा शिगेला! जावयाचा ठेका रद्द का केला नाही? महाडिक गटाचा सतेज पाटील यांना थेट सवाल

Gokul Controversy: गोकुळ दूध संघातील डिबेंचरच्या रकमेवरून पेटलेला वाद आता अधिक चिघळला आहे. संचालिका शौमिका महाडिक यांनी डिबेंचर संदर्भात मोर्चा काढल्यानंतर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी नाव न घेता टीका करत आम्ही गोकुळमध्ये सत्ता घेऊन कुणाच्याही जावयाला मोठं केलं नाही असा टोला लगावला होता. या वक्तव्याचा प्रतिकार करत महाडिक गटाने आता थेट पलटवार केला आहे. महाडिक गटाचे कार्यकर्ते प्रताप पाटील कावणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सतेज पाटील यांच्यावर तीव्र निशाणा साधला. ते म्हणाले, महाडिक यांच्या जावयाची इतकी ऍलर्जी होती तर पुन्हा वाढीव दराने त्यांनाच ठेका का दिला? सत्ता असताना पाच वर्षे ठेका रद्द का केला नाही? चांगलं काम होतं म्हणूनच पुन्हा ठेका दिलात, मग आता आक्षेप का?

हेही वाचा – Kolhapur ZP Ward Reservation: कोल्हापूर झेडपीसाठी तालुकानिहाय गटांसाठी आरक्षण जाहीर

दरम्यान, डिबेंचरचा मुद्दा दिवाळीनंतर पुन्हा पेटणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची लवकरच बैठक होणार असून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. माजी संचालक विश्वास जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, डिबेंचरचा मुद्दा वसूबारसच्या कार्यक्रमात राजकीय रंग देऊन बाजूला सारला गेला. आम्ही फक्त आमच्या हक्काची मागणी करतोय. गेल्या दहा वर्षांत इतकी मोठी रक्कम कधीही कपात झाली नव्हती. त्यामुळे आमचा विरोध कायम आहे. जाधव यांनी पुढे सांगितले की, गोकुळच्या इतिहासात प्रथमच ४० टक्के डिबेंचर घेतला गेला आहे. तो निर्णय अन्यायकारक आहे. आम्ही सहकार विभागाकडे तक्रार दाखल करणार आहोत आणि गरज पडल्यास न्यायालयाचं दार ठोठावू.

महाडिक गटाची स्पष्ट भूमिका

महाडिक गटाने स्पष्ट केलं आहे की, हा राजकीय नव्हे तर आर्थिक न्यायाचा लढा आहे. शौमिका महाडिक या फक्त सदस्यांच्या हितासाठी उभ्या आहेत. दिवाळीनंतर सभासदांची मोठी बैठक घेऊन या प्रकरणावर अंतिम भूमिका निश्चित केली जाणार आहे. गोकुळमध्ये मिठाचा खडा पडू नये, पण मिठाची पोतीच शेजारी ठेवली आहेत, त्यामुळे दूध नासायला वेळ लागणार नाही, असं उपरोधिक विधान प्रताप पाटील यांनी सतेज पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना केलं.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!