Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bombay High Court driver lawyer: मुख्य न्यायमूर्तींच्या ड्रायव्हरपासून वकिलपर्यंतचा प्रवास; जुन्नरमधल्या अशोक भद्रिगे यांच्या यशाची कहाणी

Bombay High Court driver lawyer: मुख्य न्यायमूर्तींच्या ड्रायव्हरपासून वकिलपर्यंतचा प्रवास; जुन्नरमधल्या अशोक भद्रिगे यांच्या यशाची कहाणी

Inspirational story Ashok Bhadrige: प्रयत्नांची पराकाष्ठा करा, यशाची शिखरे सर करा‘, म्हणजे अत्यंत कठोर परिश्रम करा आणि मोठे यश मिळवा हा या वाक्याचा अर्थ होतो. याला साजेशी अशी कामगिरी आज एका गरिब घरातून येणार्‍या आणि मुख्य न्यायमूर्तींचा ड्रायव्हर अशोक विलास भद्रिगे यांनी करून दाखवली आहे. त्यांनी आज मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींचा ड्रायव्हर ते वकिलीची पदवी घेऊन सनद मिळवली इथ पर्यंतचा प्रवास जिद्द, चिकाटीने पूर्ण केला.

एका ड्रायव्हरने ही कामगिरी करणारे भद्रिगे हे उच्च न्यायालयातील ओरिजनल साइडचे पहिले चालक बनले आहेत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते, तर आज आम्ही कुठे असतो नाही सांगता येणार…’ असे उद्गार अशोक भद्रिगे यांनी यानिमित्त काढले. आपल्या या कामगिरीचे श्रेय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देतात. शिवाय उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या सान्निध्यात राहिल्यावर त्यांच्या सहवासातून मिळालेल्या प्रेरणेतूनच आपण एक चालक ते वकील हा प्रवास करू शकलो, असेही भद्रिगे यांनी सांगितले.

भद्रिगे मूळचे पुण्यामधील जुन्नर इथल्या आळेफाट्याचे आहेत. मुंबईत (Mumbai) वास्तव्याला असल्याने त्यांचे भायखळ्याच्या डायमंड ज्युबिली हायस्कूलमध्ये शिक्षण झाले. मात्र, घरची परिस्थिती हलाखीची असल्याने 2009 मध्ये पदवी मिळवल्यानंतर घरचा भार सांभाळायचा हेच प्रथम कर्तव्य मानून ते कामाला लागले. 2006 ते 2009 अशोक भद्रिगे हा काळ खूप परीक्षा पाहणारा होता. याच काळात त्यांची मुंबई उच्च न्यायालयात चालकपदी निवड झाली.

2010 ला पूर्णवेळ चालक म्हणून रुजू झाले. न्यायमूर्तीचा चालक असल्यामुळे शिस्त, शिष्टाचार आणि कठोर नियम, कायदे, कलमे हे ओघाने आलेच. त्यांनी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, न्यायमूर्ती साधना जाधव, न्यायमूर्ती रियाझ छागला, न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्याकडे त्यांनी काम केले. विद्यमान सरन्यायाधीश गवई उच्च न्यायालयात असताना त्यांच्याकडे दीड वर्षे चालक म्हणून त्यांनी काम केले. सध्या ते मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्याकडे कार्यरत आहेत.

या काळात वकिलीचा विचार मनामध्ये घोंगावू लागला. वकील होण्यासाठी पदवी करणे गरजेचे होते. पदवी मिळेपर्यंत 2016 उजाडले. त्यानंतर विधी शाखेचा अभ्यास करण्यासाठी विधी महाविद्यालयात गेल्यावर सीईटीची माहिती मिळाली; परंतु सीईटीसाठी कमीतकमी 40 टक्क्यांची आवश्यकता होती. तेही नसल्यामुळे 2019मध्ये बारावीच्या गुणांच्या बळावर सीईटीसाठी अर्ज भरला.

भद्रिगे म्हणाले, 2016 पासून जुलै 2024 पर्यंत न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्याकडे चालक होतो. न्यायमूर्ती सांबरे आणि रजिस्ट्रार बदर यांनी मला पदवी परीक्षा पूर्ण करण्यास मदत केली. न्यायमूर्ती इक्बाल आणि न्यायमूर्ती रियाझ छागलांमुळे मला चेंबूर कर्नाटकाच्या विधि महाविद्यालयात (सीकेसीएल) 2020मध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर, चार वर्षे अथक प्रयत्नांनी वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झालो आणि आता तात्पुरती सनदही घेतली असून नोव्हेंबरमध्ये बारची परीक्षा देणार असल्याचे भद्रिगे सांगतात.

न्यायमूर्ती गवईंचा प्रभाव

विद्यमान सरन्यायाधीश गवईंचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. त्यांच्याकडून वकील होण्याची खरी प्रेरणा मिळाली. सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर उच्च न्यायालयात त्यांचा सत्कार सोहळा पार पडला. तेव्हा त्यांची भेट घेतली. त्यांना तुमच्याकडे काम करीत असल्याची आठवण करून दिली, त्या वेळी पदवीधर नव्हतो, आज मी कायद्याची पदवी मिळवल्याचे त्यांना सांगितले. हे ऐकताच त्यांनीही माझी पाठ थोपटली, असे भद्रिगे म्हणाले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!