Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: नगरसेवक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पत्नीनं ओढणीनं घोटला पतीचा गळा; नेमकं काय घडलं? वाचा

Pune Crime: नगरसेवक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पत्नीनं ओढणीनं घोटला पतीचा गळा; नेमकं काय घडलं? वाचा

पिंपरी चिंचवड : शहरातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने परिसर हादरला आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ता नकुल भोईर यांचा त्यांच्या पत्नीनेच खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात स्पष्ट केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नकुल भोईर आणि त्यांची पत्नी चैताली यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत भांडणं सुरू होती. पत्नीच्या चारित्र्यावर नकुल वारंवार संशय घेत असल्याने घरात तणावाचं वातावरण निर्माण होत होतं. गुरुवारी उशिरा पुन्हा एकदा वाद झाला आणि रागाच्या भरात चैतालीने ओढणीने पतीचा गळा आवळून खून केला. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी पत्नीला ताब्यात घेतलं आहे.

वादाचा शेवट खुनात

ही घटना मध्यरात्री दोनच्या सुमारास चिंचवड परिसरातील त्यांच्या राहत्या घरी घडली. दोघांमधील वाद विकोपाला गेल्याने चैतालीने अत्यंत संतापाच्या भरात पतीचा जीव घेतल्याचे तपासात समोर आले आहे. यावेळी त्यांची दोन लहान मुलं आतील खोलीत झोपलेली होती. बाहेरच्या खोलीत हा सर्व प्रकार घडला.

हेही वाचा –फलटण मधील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या; हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सांगितलं धक्कादायक कारण

सामाजिक कार्यात सक्रिय नकुल भोईर

नकुल भोईर हे पिंपरी चिंचवडमधील ओळखलेले सामाजिक कार्यकर्ते होते. शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांचा संबंध होता. शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत असतं. विशेष म्हणजे, चैताली भोईर या आगामी महापालिका निवडणुकीत नगरसेवकपदासाठी इच्छुक होत्या. निवडणुकीची तयारी दोघेही मिळून करत होते. मात्र, याच वैवाहिक नात्यातील तणाव अखेर जीवघेणा ठरला.

प्राथमिक चौकशीनुसार, ही घटना पूर्णतः कौटुंबिक कारणातून घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. चैताली भोईरला अटक करण्यात आली असून तिची सखोल चौकशी सुरू आहे. नकुलभोईर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, नेमका वाद कोणत्या कारणावरून तीव्र झाला आणि खून कसा घडला? याचा तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!