Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Minimum Balance च्या दंडावरून बँका झाल्या ‘मालामाल’; तीन वर्षांत वसूल केला 19000 कोटींचा दंड…

Minimum Balance च्या दंडावरून बँका झाल्या ‘मालामाल’; तीन वर्षांत वसूल केला 19000 कोटींचा दंड…

मुंबई : ग्राहकांच्या बँक खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल आकारल्या जाणाऱ्या शुल्कातून मोठी रक्कम वसूल केली जात आहे. अहवालानुसार, भारतीय बँकांनी गेल्या तीन वर्षांत अशा दंडाच्या स्वरूपात अंदाजे १९०८३ कोटी वसूल केले आहेत. याचा अर्थ, या लहान शुल्कांचा ग्राहकांच्या खिशावर मोठा भार पडत आहे.

किमान शिल्लक शुल्कातून मिळणाऱ्या महसुलाच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, खासगी बँकांचा यात मोठा वाटा आहे. एचडीएफसी बँकेसह खासगी बँकांनी गेल्या तीन वर्षांत दंडाच्या स्वरूपात अंदाजे १०९९१ कोटी वसूल केले आहेत, जो एकूण दंडाच्या रकमेच्या निम्म्याहून अधिक आहे. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीही या कालावधीत अंदाजे ८०९२ कोटींचे शुल्क वसूल केले. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मिळून या दंडांमधून लक्षणीय रक्कम वसूल केली आहे.

एचडीएफसी बँक पहिल्या क्रमांकावर

प्रत्येक बँकेचा विचार केल्यास, एचडीएफसी बँक यादीत अव्वल आहे. या बँकेने दंडाच्या स्वरूपात अंदाजे ३८७१ कोटी वसूल केले. ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनीही एकूण १००० कोटींहून अधिक दंड वसूल केला.

‘या’ बँका आकारत नाहीत दंड

देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि पंजाब नॅशनल बँक, किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल कोणतेही शुल्क आकारत नाहीत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!