नवी दिल्ली : चीन जगभरात नवीन तंत्रज्ञानासाठी ओळखला जातो. त्यातच या आठवड्यात एका चिनी कंपनीने ‘उडणारी कार’ अर्थात Flying Car चे चाचणी उत्पादन सुरू केले, जी वाहतुकीच्या जगात तंत्रज्ञानाची पुढील पिढी मानली जाते. चिनी कंपनीने टेस्लाला मागे टाकले आहे.
टेस्ला आणि इतर अमेरिकन ब्रँड अजूनही योजना विकसित करण्यास सुरुवात करत आहेत. मात्र, चीनने या सर्वांना मागे टाकले आहे. त्यामुळे भविष्यात स्पर्धा तीव्र होणार आहे. चीनी इलेक्ट्रिक कार उत्पादक एक्सपेंगची उपकंपनी एक्सपेंग एरोह्टने सोमवारी जगातील पहिल्या उडत्या कार इंटेलिजेंट फॅक्टरीत उत्पादन सुरू केले. ‘नेक्स्ट जनरेशन’च्या वाहतुकीच्या व्यापारीकरणात हा एक मैलाचा दगड मानला जातो.
दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग प्रांताची राजधानी असलेल्या ग्वांगझूच्या हुआंगपू जिल्ह्यात असलेल्या १२०००० चौरस मीटरच्या कारखान्याने आधीच त्याच्या मॉड्यूलर उडणारी कार, ‘लँड एअरक्राफ्ट कॅरियर’चे पहिले वेगळे करता येणारे इलेक्ट्रिक विमान तयार केले आहे. त्यानंतर आता फ्लाईंग कार आणली जात आहे.


