नवी दिल्ली : बँकिंग व्यवहार करताना आता अडचणीतून मार्ग निघणार आहे. शनिवारपासून (दि.४) बँकिंग प्रणालीमध्ये मोठा बदल झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ४ ऑक्टोबरपासून ‘फास्ट चेक क्लिअरन्स सिस्टम’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन प्रणालीमुळे चेक त्याच दिवशी क्लिअर केला जाणार आहे. पूर्वी १-२ दिवसांचा प्रतीक्षा कालावधी होता. मात्र, आता हा नियम बदलला आहे.
चेक क्लिअरन्ससाठी यापूर्वी काही दिवस लागत होते. मात्र, या नवीन प्रणालीमुळे हे बदलणार आहे. जी सतत चेक क्लिअरिंग लागू करेल. या प्रणाली अंतर्गत सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत जमा केलेले सर्व चेकचे फोटो आणि डेटा त्वरित स्कॅन केले जातील आणि क्लिअरिंग हाऊसला पाठवले जातील, जे संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चेकचे व्हेरिफिकेशन करेल. जर बँक वेळेवर प्रतिसाद देण्यात अयशस्वी झाली तर चेक आपोआप क्लिअर झाला असे मानले जाईल.
दरम्यान, ही नवीन सिस्टिम सुरुवातीला दिल्ली, मुंबई आणि चेन्नई सारख्या प्रमुख शहरांच्या क्लिअरिंग ग्रिडमध्ये लागू केली जाईल आणि नंतर देशभरात लागू केली जाईल. यामुळे बँकिंग पायाभूत सुविधांची गुणवत्ता सुधारेल आणि चेक पेमेंटचा अनुभव अधिक सुलभ होईल.
‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ अनिवार्य
आरबीआयने मोठ्या रकमेच्या चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम अनिवार्य केले आहे. यामुळे ग्राहकांना बँकेला मुख्य चेक तपशील आगाऊ प्रदान करता येतील, ज्यामुळे फसवणुकीचा धोका कमी होईल आणि चुकीच्या चेकचे स्वयंचलित क्लिअरन्स टाळता येईल.


