Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Gold, Silver Rates: सोने-चांदीच्या दरात मोठा भूकंप; चांदी 31,000 रुपयांनी स्वस्त, सोन्याच्या दरात 13,000 रुपयांची घसरण

Gold, Silver Rates: सोने-चांदीच्या दरात मोठा भूकंप; चांदी 31,000 रुपयांनी स्वस्त, सोन्याच्या दरात 13,000 रुपयांची घसरण

Gold, Silver Rates Crash: काही दिवसांपूर्वी सोने व चांदीचा दर रॅकेट वेगाने वर गेले होते. सोने ग्रॅममागे दोन लाखांपर्यंत गेले होते. तर चांदीचा दर किलोला तीन लाखांपर्यंत गेला होता. तर परंतु आता जागतिक घडामोडीमुळे सोने (Gold), चांदीचे दर (Silver)कोसळत आहेत सोमवारी या दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण झाली आहे. सोमवारी दुपारी वायदा बाजारात एमसीएक्स (MCX) सोने, चांदीचे घसरण झाली आहे. सोनेच्या दरात काही दिवसात दहा ग्रॅममागे तब्बल 15 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात किलोमागे तब्बल 27 हजारांनी घसरण झालीय.

एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅममागे 1 लाख 39 हजारावर आला आहे. मागील व्यवहाराच्या तुलनेत सुमारे पाच हजाराने घसरण झालीय. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 23 हजारावर आला आहे. तर चांदीचा दर किलोमागे 2 लाख 18 हजार झाला आहे. सोमवारी आठ हजार रुपयांनी घसरण झालीय. या घसरणीमागील कारणे जाणून घ्या ? महत्त्वाचे कारण भू राजकीय तणाव आहे. बाजारातील वाढत्या अनिश्चिततेमुळे सोने व चांदीच्या दरात दबाव आला आहे.

इराणचा इशारा
अमेरिकेने इराणच्या पॉवर ग्रिडवर हल्ला केलेला आहे. त्यामुळे इराणकडून प्रत्युत्तर म्हणून आखाती देशांच्या ऊर्जा आणि जल पायाभूत सुविधांना टार्गेट केले जाऊ शकते. या इशाऱ्यामुळे बाजारातील अनिश्चितता वाढलीय.

होर्मुझमधील तणाव
वीज प्रकल्पांवर हल्ले झाले तर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केली जाईल, असा इशारा इराणने दिलाय. हा मार्ग जागतिक तेल पुरवठ्यासाठी महत्त्वाचा आहे, ज्यामुळे बाजारात चिंता वाढलीय.

कच्चा तेलाच्या किमती
कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 110 डॉलरवर गेल्या आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्याच्या धमक्यांमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढलीय.

जागतिक बाजारांवरील दबाव
अमेरिका आणि आशियातील शेअर बाजारही घसरले आहेत. अमेरिकन फ्युचर्समध्ये घसरण झाली आहे. यामुळे बाजारात जोखीम टाळण्याची प्रवृत्ती वाढलीय.

व्याजदरातील अनिश्चितता: गुंतवणूकदार अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या पुढील निर्णयाबाबतही सावध आहेत. बाजारात व्याजदरवाढीची अपेक्षा आहे. यामुळे सोने आणि चांदीसारख्या धातूंचे आकर्षण कमी झाले आहे.

जागतिक बाजारपेठांवरही दबाव
जागतिक बाजारपेठांमधील संकेतही अशाच ट्रेंडकडे निर्देश करत आहेत. स्पॉट गोल्ड सुमारे 2.5 टक्क्यांनी घसरून प्रति औंस सुमारे 4372 डॉलरवर आले आहे. त्यामुळे अमेरिकन गोल्ड फ्युचर्समध्ये सुमारे 4.4 टक्क्यांची घसरण झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!