मुंबई : शेअर मार्केटमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात चांगला परतावा मिळावा म्हणून अनेकांचा कल यामध्ये गुंतवणुकीत असतो. जर तुम्ही २५-२७ वर्षांपूर्वी काही शेअर्समध्ये फक्त १०००० रुपयांची गुंतवणूक केली असती तर ते अंदाजे १९ कोटी रुपयांचे झाले असते.
ग्लोबल ब्रोकरेज हाऊस सीएलएसएने २८ वर्षांपूर्वीचा रिपोर्ट जाहीर केला. ज्यामध्ये गुंतवणूकदारांसाठी काही कंपन्यांमध्ये फक्त १०००० रुपयांच्या गुंतवणुकीने सुमारे २८ वर्षांत ते १.३५ कोटी रुपयांचे (अंदाजे १९.१७ कोटी रुपयांचे) झाले. तुम्हाला योग्य स्टॉक निवडण्याची आणि त्यावर टिकून राहण्याची आवश्यकता आहे, म्हणजे तुम्हाला बराच काळ वाट पाहावी लागेल. वेस्टलाइफ फूडवर्क्स ब्रोकरेज फर्म CLSA च्या यादीत अव्वल स्थानावर आहे.
दरम्यान, गेल्या २८ वर्षांत त्यांनी अंदाजे १९१७०३९ टक्के परतावा दिला आहे. याचा अर्थ असा की जर २८ वर्षांपूर्वी या कंपनीत १०००० रुपये गुंतवले असते तर ते आता १९.१७ कोटी रुपये झाले असते.


