Gold Silver Price: अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाली असली तर इस्त्रायलनं लेबनॉनवर हल्ले केल्यानं इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली होती. यामुळं शस्त्रसंधीवर प्रश्न निर्माण झाला आहे या सर्व घडामोडींचा परिणाम शेअर बाजार आणि सराफा बाजारात देखील दिसला.
आज (9 एप्रिल) सोन्याच्या दरात 1585 रुपयांची घसरण झाली. तर, चांदीच्या दरात 8566 रुपयांची घसरण झाली. सध्या एक किलो चांदीचा दर 235475 रुपये किलोवर पोहोचला आहे. तर,24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 149536 रुपयांवर पोहोचला आहे.
लग्नसराईचा हंगाम सुरु होण्यापूर्वी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्यानं दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. 22 कॅरेट सोने आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरात देखील घसरण झाली आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 1189 रुपयांची घसरण झाली असून एका तोळ्याचा दर 112152 रुपयांवर आला आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1452 रुपयांची घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 136975 रुपये इतका आहे.
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर दुपारी दीड वाजता सोन्याचे दर 151591 रुपये होते. तर चांदीचे दर 237083 रुपयांवर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केल्यास स्पॉट गोल्ड सोन्याचा दर 4715.45 डॉलर प्रति औंस इतके आहेत. स्पॉट सिल्वरच्या दरात आज घसरण झाली असून दर 73.93 डॉलर प्रति औंस झाले आहेत.


