Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘धुरंधर 2’ ने पहिल्याच दिवशी ओलांडला 200 कोटींचा टप्पा; रणवीर सिंगसह आदित्य धरही हॅप्पी…

‘धुरंधर 2’ ने पहिल्याच दिवशी ओलांडला 200 कोटींचा टप्पा; रणवीर सिंगसह आदित्य धरही हॅप्पी…

मुंबई : सध्या अनेक सिनेमे रिलीज केले जात आहेत. त्यात आदित्य धर यांच्या ‘धुरंधर २’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. ही प्रतीक्षा अखेर संपली असून, १९ मार्च रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला. ‘धुरंधर’प्रमाणेच ‘धुरंधर २’ला सुद्धा चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ‘धुरंधर 2’ ने पहिल्याच दिवशी 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

धुरंधरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोक आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सिनेमा हा चित्रपट पाहत आहेत. चित्रपटाच्या यशाने निर्माते आणि कलाकार खूप आनंदित झाले आहेत. रणवीर सिंगला तर आनंदाने नाचण्याचा मोह आवरता आला नाही. चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मुंबईत एका विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. या स्क्रीनिंगमध्ये चित्रपटाचे कलाकार जल्लोष करताना दिसले. आदित्य धर यांचा ‘धुरंधर २’ हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा हिट चित्रपट मानला जात आहे.

दरम्यान, चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेली हमजाची भूमिका उत्कृष्ट आहे. त्याने केवळ हमजाची भूमिका साकारली नाही, तर ती जगली. म्हणूनच, चित्रपटाच्या यशानंतर रणवीर ‘फाला’ या गाण्यावर नाचताना दिसला. रणवीरचा हा मनमोकळा डान्स ‘धुरंधर २’च्या यशाने खूप आनंदी आहे.

आदित्य धरचं होतंय कौतुक

आदित्य धर यांनी हा चित्रपट जितक्या हुशारीने बनवला, तितक्याच हुशारीने तो प्रदर्शित केला. याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित झाला, ज्याचा त्याच्या कमाईला लक्षणीय फायदा झाल्याचे दिसते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!