अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त आणि हाय टीआरपी असलेला शो ‘बिग बॉस 19’ सध्या तुफान चर्चेत आहे. स्पर्धकांचे वाद आणि नाती सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. नुकतीच आता बिग बॉसबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. ‘बिग बॉस 19’ शोचा प्रसिद्ध आणि दमदार खेळाडू प्रणित मोरे आऊट झाल्याची माहिती समोर येत आहे. आपल्या खेळीने प्रणितने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. वोटींगमध्ये तो टॉप टूवर आहे. आता तो आऊट झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, खरं काय ते लवकरच समोर येईल.
प्रणित मोरे याला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी नाराजी आहे. बिग बॉसच्या घरात मच्छर आले कुठून? असा प्रश्न चाहते विचारत आहेत. तो ‘बिग बॉस 19’ मधून आऊट झाला आहे. असं सांगण्यात येत आहे. त्याशिवाय, प्रणित याला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. एक्सवर अशा अनेक पोस्ट व्हायरल होत आहे. जेथे प्रणित याला डेंग्यू झाला असं सांगण्यात आलं आहे.
डेंग्यू झाल्यामुळे प्रणित याला रुग्णालयात, सिक्रेटरूममध्ये किंवा घरी उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावर आता काय नेमकं होणार याकडे लक्ष लागल आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असल्याची देखली माहिती मिळत आहे. डॉक्टरांनी प्रणित याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. प्रणित याची प्रकृती स्थिर नसल्यामुळे चाहत्यांनी देखील चिंता व्यक् केली आहे. सध्या सर्वत्र प्रणित याची चर्चा सुरु आहे.
प्रणितच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर प्रणित याची पुन्हा ‘बिग बॉस 19’ मध्ये एन्ट्री होणार की नाही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सांगायचं झालं तर, या आठवड्याच प्रणित घराचा कॅप्टन झाला होता.शेहबाज आणि प्रणित यांच्यामध्ये घरातील सदस्यांनी प्रणित याला कॅप्टन केलं. आठवडाभर कॅप्टन्सीची जबाबदारी सांभाळ्यानंतर प्रणित याला चांगला पाठिंबादेखील मिळाला.


