Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘काटा लगा” फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं 42 व्या वर्षी निधन, मनोरंजन सृष्टीवर शोककळा

‘काटा लगा” फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं 42 व्या वर्षी निधन, मनोरंजन सृष्टीवर शोककळा

मुंबई : बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मॉडेल व अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे निधन झाले आहे. विरल भयानी यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये शेफालीच्या मृत्यूची माहिती शेअर करण्यात आली आहे. शेफाली मुंबईतील अंधेरी लोखंडवाला भागात राहत होती. अचानक रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तिला छातीत दुखू लागल्याने पती परागने तिला ताबडतोब रुग्णालयात नेले. मात्र, तिच्यावर उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शेफालीचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे समजत आहे. शेफालीच्या मेकअप आर्टिस्टने तिच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. शेफालीच्या कुटुंबाकडून अद्यापही यावर अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही. शेफाली फक्त ४२ वर्षांचीच होती. शेफालीच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला असून, शोककळा पसरली आहे.

विरल बयानीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘शेफालीला तिचा पती व इतर तिघांनी बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी शेफालीचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचं सांगितले. रुग्णालयाच्या डॉक्टर यांनी या वृत्ताचे खंडन केले नाही मात्र, त्यांनी यावर कोणतीही माहिती देण्यास टाळले आहे. दरम्यान, शेफालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला असून, आज शेफालीवर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.

शेफाली जरीवालाच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला असून, अजूनही चाहत्यांना यावर विश्वास ठेवणे अवघड जात आहे. चाहते सोशल मीडियावर कमेंट करत असून, शोक व्यक्त करत आहे.

‘काटा लगा’ फेम अभिनेत्रीने काही काळापूर्वी लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस देखील केला होता. तिने बिग बॉस १३ मध्ये दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला सोबत भाग घेतला होता. सिद्धार्थ शुक्लाचा देखील हृदयविकाराने अचानक निधन झाल्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले होते. आता शेफालीसोबतही असेच काही घडले असून, चाहत्यांना तिच्या मृत्यूची बातमी पचवणे अवघड जात आहे.

दरम्यान, शेफालीच्या मृत्यूच्या बातमीनंतर, तिचा पती परागचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो गाडीत बसलेला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये पराग खूप दुःखी दिसत आहे. या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये, शेफालीच्या मृत्यूच्या बातमीने युजर्सना धक्का बसला असून, युजर्सनी अभिनेत्रीच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!