Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अभिनेत्री श्रेया बुगडे सांगणार महिलांची यशोगाथा

अभिनेत्री श्रेया बुगडे सांगणार महिलांची यशोगाथा

महाराष्ट्र जागरण: उमेद अभियान व एसबीआय फाउंडेशनमुळे स्त्रियांच्या स्वप्नांना बळ मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने पहिल्यांदाच ‘उमेद अभियान’ अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहातील महिला उद्योजकांसाठी ‘घे भरारी-मला पंख मिळाले’ हा नवाकोरा टीव्ही शो सुरू केला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री श्रेया बुगडे करणार आहे. याबद्दलच श्रेया म्हणते, स्त्रियांना प्रत्येक कठीण प्रसंगातून जावे लागते.

मुख्यतः ग्रामीण भागातील महिलांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन, प्रोत्साहन मिळत नाही. पण ‘उमेद अभियान’ अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन नक्की मिळेल. या कार्यक्रमातून ३९ महिलांची यशोगाथा ऐकायला मिळणार आहे आणि मुख्य म्हणजे हा अनुभव मला प्रत्यक्ष त्या स्त्रियांसह संवाद साधून अनुभवता येणार आहे.

प्रत्येक महिलेच्या आयुष्यात खचून जाणारा क्षण येतोच, पण आता प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची नवी उमेद मिळेल. आता स्त्री फक्त चूल, मूल सांभाळणारी नसेल तर ती एक उद्योजिकाही असेल. ‘उमेद अभियान’ चं खूप कौतुक वाटतं आणि या अभियानाचा मला एक भाग होता येतंय या गोष्टीचा आनंद आहे. घे भरारी- मला पंख मिळाले या कार्यक्रमाद्वारे स्वबळावर उभ्या राहिलेल्या ३९ महिलांशी संवाद साधण्यास व त्यांची यशोगाथा ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानचे मुख्य अधिकारी रुचेश जयवंशी या अभियानात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!