महाराष्ट्र जागरण: आज आपण बॉलीवूडच्या एका श्रीमंत अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, जो एकेकाळी चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी वृत्तपत्र बेंचवर पसरवून झोपायचा. त्यावेळी अभिनेत्रीला मात्र मेकअप व्हॅन मिळाली होती. १२०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक असलेला उद्योगपती आणि अभिनेता असलेल्या विवेक ओबेरॉय याने २२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आपल्याला कशी वागणूक दिली गेली याचा खुलासा केला.
२००२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘साथिया’ असे या चित्रपटाचे नाव आहे. ज्यामध्ये राणी मुखर्जीसोबत विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट आला तेव्हा राणी लोकप्रिय होती आणि विवेक स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. विवेक ओबेरॉयने सांगितले की, त्यावेळी राणीकडे मेकअप व्हॅन होती. शाद अली माझा बालपणीचा मित्र आहे. त्याने एके दिवशी मला फोन केला. तो म्हणाला की, मला ‘अलायपायुथे’ या तमिळ चित्रपटाची हिंदी आवृत्ती बनवायची आहे. तर तू मॅडीची भूमिका करतोस. मी कंपनी करत होतो म्हणून मी नकार दिला. नंतर मी ‘साथिया’ हा चित्रपट साइन केला.
‘साथिया’ हा छोट्या बजेटचा सिनेमा होता. राणी त्यावेळी मेकअप व्हॅन वापरायची. मी रेस्टॉरंट्स किंवा हॉटेल्सच्या वॉशरूममध्ये जाऊन कपडे बदलायचो. टच अप तर रस्त्यावरच व्हायचे. कारण त्यावेळी मला कोणी ओळखत नव्हते. मी स्वतः ट्रायपॉड उचलायचो आणि बाकीच्या क्रूसोबत फिरायचो. मी रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकावर वर्तमानपत्र पसरवून थोडा वेळ झोपायचो जेणेकरून मला फ्रेश वाटेल. विवेक आणि राणीचा ‘साथिया’ हा चित्रपट हिट ठरला होता. विवेक शेवटचा रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ या चित्रपटात दिसला होता. आता विवेक चित्रपटांपेक्षा त्याच्या व्यवसायात जास्त व्यस्त आहे. त्याची एकूण संपत्ती १२०० कोटी आहे.


