पुणे: पेरू औषधी गुणधर्माने समृद्ध मानला आहे. याच्या सेवनाने बरेच आरोग्यदायी फायदे मिळतात. याला उलट्या रोखण्यासाठी असरदार मानतात, तसेच हृदयरोगापासून देखील बचाव होतो. तर हे भारतात मिळणारे एक साधे फळ आहे, ज्याचे प्राचीन संस्कृत नाव अमृत किंवा अमृत फळ आहे. वाराणसीमध्ये याला लोक अमृत नावानेच संबोधित करतात. पेरूप्रमाणेच त्याची पानेदेखील खूप उपयुक्त असतात. यामध्ये अँटी ऑक्सिडेंट, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लमेंटरी गुणधर्म असतात, जे अनेक आजारांपासून संरक्षण करतात. चला जाणून घेऊ या पेरूच्या पानाचे फायदे….
पोटदुखी आणि उलट्यांमध्ये देखील आराम देतात
पेरूच्या पानात अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात, अशावेळी त्याच्या पाण्याचे सेवन केल्याने आपल्या पोटाचे दुखणे दूर होऊ शकते. तसेच हे आपल्याला उलट्यांपासून देखील आराम देते. यासाठी आपण पेरूच्या ५-६ पानांना १० मिनिटे उकळवून घ्या आणि नंतर गाळून त्याचे पाणी प्या.
सांधेदुखीचा त्रास दूर होतो
सांधेदुखीमध्ये देखील पेरूची पाने फायदेशीर आहेत. यासाठी आपण पेरूची पाने वाटून त्याचा लेप बनवा आणि त्या लेपाला सांध्यांवर लावा, यामुळे आपल्याला वेदनेपासून आराम मिळेल.
मधुमेहात देखील फायदेशीर
पेरूची पाने पाण्यात टाकून प्यायल्याने हे मधुमेहासाठी फायदेशीर मानले जाते. वास्तविक हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते. याशिवाय हे शरीरातील जटील स्टार्च साखरेमध्ये बदलण्यापासून रोखते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
दाताच्या दुखण्यापासून आणि हिरड्यांची सूज कमी करते
पेरूच्या पानाचे पाणी दात दुखणे, हिरड्यांची सूज आणि तोंडाच्या छालापासून आराम देण्याचे काम करते. आपण याची पाने उकळवून त्या पाण्याने गुळण्या करा. असे केल्यास आपल्याला खूप आराम मिळेल.


