आपल्या आरोग्याकडे लक्ष देणारे अनेकजण आहेत. पण, काहीजण दुर्लक्ष करतानाही दिसत आहे. त्यात काही लोक त्यांच्या किडनीच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. परिणामी, अनेक समस्या उद्भवू शकतात. किडनी शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन राखतात आणि रक्तदाब नियंत्रित करतात. शिवाय, ते आपली हाडे आणि रक्त निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
अयोग्य आहार आणि अपुरे पाणी, उच्च रक्तदाब आणि साखर यांसारख्या परिस्थिती मूत्रपिंडांवर दबाव आणतात. ज्यामुळे किडनी खराब होण्याची शक्यता असते. किडनी शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यापासून रोखते. जर ती खराब झाल्यास किडनीच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. मूत्रपिंडाच्या समस्या केवळ प्रौढांनाच नव्हे तर लहान मुलांना देखील उद्भवू शकते. नेफ्रोटिक सिंड्रोम ही मुलांसाठी, विशेषतः प्रीस्कूल किंवा प्राथमिक शाळेतील मुलांसाठी धोकादायक स्थिती आहे.
नेफ्रोटिक सिंड्रोम तेव्हा होतो जेव्हा मूत्रपिंडातील लहान फिल्टर खराब होतात, ज्यामुळे जास्त प्रोटीन मूत्रात गळतात. यामुळे द्रवपदार्थ टिकून राहणे, सूज येणे आणि रक्त संतुलन बिघडणे यासारख्या अनेक गुंतागुंत होऊ शकतात. जर ही स्थिती लवकर ओळखली गेली नाही तर भविष्यात मुलाला गंभीर गुंतागुंत होऊ शकते. म्हणूनच, या आजाराची सुरुवातीची लक्षणे ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे; तरच मुलाला भविष्यातील धोक्यांपासून वाचवता येईल.


