हिवाळ्याच्या काळात खोकला आणि फ्लूचे रुग्ण सर्वात जास्त आढळतात. हिवाळ्यात खोकला येत असताना, लोक अनेकदा मेडिकल स्टोअरमध्ये जातात आणि डॉक्टरांचा सल्ला न घेता ओव्हर-द-काउंटर औषधे खरेदी करतात. सर्दी आणि खोकल्याची औषधे रंगीबेरंगी पॅकेजिंगमध्ये सहज उपलब्ध असतात, ज्यामुळे त्वरित आराम मिळण्याचे आश्वासन मिळते. पण, ही औषधे पूर्णपणे सुरक्षित नसतात.
खोकला आणि सर्दीसाठी वापरल्या जाणाऱ्या ओव्हर-द-काउंटर औषधांचा आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. भारतातील लोक त्यांच्या संभाव्य धोक्यांना न ओळखता डीकंजेस्टंट्स, अँटीहिस्टामाइन्स, डेक्स्ट्रोमेथोर्फन, पॅरासिटामॉल आणि आयबुप्रोफेन सारखी औषधे वापरतात. कंजेस्टंट्स नाक बंद होणे कमी करतात, ज्यामुळे रुग्णांना सर्दी दरम्यान अधिक सहजपणे श्वास घेता येतो.
सलग अनेक दिवस नाकाचे स्प्रे वापरल्याने जळजळ वाढू शकते. याने अनेक दुष्परिणाम समोर येऊ शकतात. यामुळे रक्तदाब वाढू शकतो. हृदयाची गती वाढू शकतो. तसेच अस्वस्थता आणि निद्रानाश होऊ शकते. हृदयरोगी, उच्च रक्तदाब, मधुमेहींसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.


