Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘या’राशींसाठी आर्थिक कामास ‘दिवस अनुकूल; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

‘या’राशींसाठी आर्थिक कामास ‘दिवस अनुकूल; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

महाराष्ट्र जागरण डेस्क: दैनिक राशिभविष्य हे ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालींवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे दैनंदिन अंदाज तपशीलवार वर्णन केले आहे. चला, तर मग जाणून घेऊयात आजचे राशिभविष्य…

मेष: काहींना विविध लाभ होणार आहेत. मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देवू शकणार आहात. आर्थिक कामास ‘दिवस अनुकूल आहे. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील.

वृषभ : तुमचा सर्वत्र प्रभाव राहील, मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण करू शकणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा दबदबा राहील.

मिथुन : प्रवासाचे योग येतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्यामध्ये असणारी जिद्द व चिकाटी वाढणार आहे. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहणार आहात. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

कर्क : काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहणार आहे. व्यवसायातील आर्थिक कामे यशस्वी होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. चिकाटी वाढणार आहे.

सिंह : आरोग्य उत्तम राहणार आहे. दैनंदिन तसेच इतर महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण करू शकणार आहात. वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. उत्साही राहाल.

कन्या: काहींना निरुत्साह जाणवणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. कामाचा ताण व दगदग जाणवेल. दैनंदिन कामे रखडणार आहेत. अस्वस्थता राहील. प्रवास टाळावेत.

तुळ : प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. तुमचे मन अत्यंत आनंदी राहणार आहे. आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. नवे स्रेहसंबंध जुळतील. प्रवासास दिवस अनुकूल आहे. विविध लाभ होतील.

वृश्चिक: नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. उत्साहाने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावू शकणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभेल. स्वास्थ्य लाभणार आहे.

धनु : प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल उत्तम राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जिद्द वाढणार आहे. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील.

मकर: प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता हवी. आज तुम्हाला एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आरोग्य जपावे. काहींवर एखादे भावनिक दडपण राहील.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन व इतर महत्त्वाच्या कामात दिवस विशेष अनुकूल आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल. उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात.

मीन : आर्थिक कामास दिवस अनुकूल नाही. दैनंदिन आर्थिक कामे जपून करावीत. प्रवासात व वाहने चालवताना विशेष दक्षता घ्यावी. प्रतिकूलता जाणवणार आहे. मानसिक अस्वस्थता राहणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!