Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune liquor Tragedy : पुण्यात विषारी दारूने 18 बळी; आमदार रोहित पवारांकडून हडपसरमध्ये दारू अड्ड्यांची तोडफोड

Pune liquor Tragedy : पुण्यात विषारी दारूने 18 बळी; आमदार रोहित पवारांकडून हडपसरमध्ये दारू अड्ड्यांची तोडफोड

Pune liquor Tragedy : पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणानंतर संपूर्ण राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापले आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत थेट मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह पुण्यातील हडपसर परिसरातील अवैध दारू अड्ड्यांवर अचानक धडक देत तिथे तोडफोड केली. मनसे स्टाईलने केलेल्या या थेट कारवाईमुळे हडपसर भागात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मुख्य संशयित योगेश वानखेडेला अटक; ‘असे’ चालायचे नेटवर्क
दापोडी-फुगेवाडी आणि हडपसर परिसरात गावठी आणि बंदी असलेल्या हातभट्टीच्या दारूमुळे हा भीषण अनर्थ ओढवला. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. विषारी दारू बनवणारा मुख्य संशयित सूत्रधार योगेश वानखेडे (रा. मुंढवा, पुणे) हा घटनेनंतर स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. वानखेडे हा पुण्याच्या उरुळी कांचन आणि पिंपरीच्या फुगेवाडी भागात बनावट दारू तयार करायचा आणि हा जीवघेणा साठा हडपसर, काळेपड आणि पिंपरी-चिंचवडच्या विविध भागांत पुरवला जात होता. पोलिसांनी या विविध ठिकाणांवरून बनावट दारूचे कॅन जप्त केले आहेत.

रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी तातडीने पुण्याच्या ससून रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. मात्र, रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी ‘गोपनीयतेचे कारण’ पुढे करत शवविच्छेदन किंवा वैद्यकीय अहवाल दाखवण्यास नकार दिला, ज्यावर आमदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. “पुण्यातील ही भीषण दुर्घटना म्हणजे राज्याच्या गृह विभागाच्या भ्रष्टाचारी आणि ढिसाळ कारभाराचे जिवंत उदाहरण आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने बेकायदेशीर धंद्यांकडे डोळेझाक केली, ज्यामुळे आज 18 निष्पाप लोकांचा जीव गेला. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून सरकारने महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली पाहिजे,” असा घणाघाती आरोप रोहित पवारांनी केला. बहुमताच्या जोरावर सत्तेत बसलेल्या या सरकारने जनतेचा विश्वास गमावला असून, अवैध व्यवसायांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचेही ते म्हणाले.

मृतांचा आकडा आणि सद्यस्थिती
या विषारी दारू प्रकरणामुळे दोन्ही शहरांतील मिळून आतापर्यंत एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे पीडित कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विषारी दारू शरीरात गेल्यामुळे अनेक बाधितांवर सध्या विविध रुग्णालयांमध्ये तातडीने उपचार सुरू असून, त्यातील काहींची परिस्थिती अजूनही कमालीची चिंताजनक आहे. दरम्यान, ससून रुग्णालयाकडून अद्याप या प्रकरणाचा अधिकृत वैद्यकीय अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याने तपास यंत्रणा पुढील कारवाईसाठी वैद्यकीय निष्कर्षांची वाट पाहत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!