नागपूर: गिट्टीखदान पोलिसांनी हरविलेले व चोरीला गेलेल्या ३४ मोबाइलचा शोध घेत मूळ मालकांना परत केले. या मोबाइलचा शोध बंगाल, नागपूर, कळमेश्वर, आग्रा आणि मंडाळा भागात घेण्यात आला.
एकनाथ महादेव चौधरी, सागर पांडुरंग बदमाशी, हार्दिक संजय खोरगडे, विक्रम विनोद सिंग, अचल विनोद मेश्राम, चेतन विश्वास सोमकुवर, तेजू लल्लू पटेल, राहुल मनमोहन तिवारी, ज्योत्स्ना जयंतलाल, हार्दिक संजय खोरगडे, केशव रामजी उईके, सागर किशोर आत्राम, सुमीत विरसिंग भलावी, कमला उमेश मेश्राम, स्वप्निल मधुकर मेश्राम, कुणाल रमेश चिंचे, रोहित अनुपराम यांच्या मालकीचे एकूण सहा लाख ६५ हजार रुपयांचे हे मोबाइल आहेत.
ही कामगिरी परिमंडळ क्रमांक दोनचे पोलीस उपायुक्त राहुल मदने, सदर विभागाच्या साहाय्यक पोलीस आयुक्त सुनीता मेश्राम यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने, पोलीस हवालदार गैबी नागरे, पोलीस हवालदार कमलेश शाहू, पोलीस शिपाई विक्रम ठाकूर यांनी केली.


