Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कोलाडनजीक धावती बस पेटली; प्रवासी बचावले

कोलाडनजीक धावती बस पेटली; प्रवासी बचावले

रोहा : मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी मध्यरात्री कोलाडनजीक धावत्या लक्झरी बसने अचानक पेट घेतला. या दुर्घटनेमध्ये प्रवासी सुदैवाने बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु बस पूर्णतः जळून खाक झाली. कोलाडनजीक कोकण रेल्वे पुलाखाली ही भयावह घटना घडली. सुदैवाने कोणतीही रेल्वे गाडी न धावल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर रात्री बाराच्या सुमारास ही खासगी बस मुंबई बोरिवलीहून महाड मालवणच्या दिशेने जात असताना कोलाडनजीक कोकण रेल्वे पुलाजवळ अचानकपणे गाडीच्या मागच्या बाजूला जोरदार आवाज आला. बसचालकाने ताबडतोब बस थांबवली. चालकासह बसमधील साथीदारांनी तत्काळ उतरून मागे जाऊन तपासले असता गाडीमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आले. गाडीमध्ये एकूण प्रवास करणाऱ्या तीस प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले.

जवळच असलेले पोलीस प्रशासन तसेच चंद्रकांत लोखंडे, विनायक लोखंडे, दादा धुमाळ, वनविभागाचे अधिकारी, शिक्षक गर्जे, आशिष वाणी व असंख्य सतर्क नागरिक यांच्या मदतीने सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला संपर्क साधला. माहिती मिळताच एसव्हीआरएसएस पथक धाटाव, औद्योगिक अग्निशमन दल तसेच दीपक नायट्रेट फायर टीम घटनास्थळी दाखल झाली व लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यात आले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु गाडीचे फार मोठे नुकसान झाले. या घटनेबाबत कोलाड पोलीस अधिकारी अधिक तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!