Today गुरूवार, 29th ऑक्टोबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Free Saree Scheme: सरकारचं लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! ‘या’ कुटुंबांतील महिलांना मिळणार मोफत साडी

Free Saree Scheme: सरकारचं लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! ‘या’ कुटुंबांतील महिलांना मिळणार मोफत साडी

Free Saree Scheme: राज्य सरकारने अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. ‘कॅप्टिव्ह मार्केट’ योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी दरवर्षी एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर शहरात या योजनेच्या अंमलबजावणीची तयारी पूर्ण झाली असून, लवकरच रेशन दुकानांमार्फत साड्यांचे वितरण सुरू होणार आहे.

काय आहे ‘मोफत साडी’ योजनेची अट?

  • पात्रता: या योजनेचा लाभ केवळ ‘अंत्योदय’ (Antyodaya) शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांनाच मिळणार आहे.
  • ई-पॉस (e-PoS) अनिवार्य: साड्यांचे वितरण पारदर्शक व्हावे यासाठी ‘ई-पॉस’ यंत्राद्वारे आधार प्रमाणीकरण करूनच साडी दिली जाईल. लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करणे प्रशासनाला बंधनकारक आहे.

असे होणार वितरण
या योजनेसाठी ‘महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ’ नोडल संस्था म्हणून काम करत आहे. महामंडळ साड्यांचे गठ्ठे सरकारी गोदामांपर्यंत पोहोचवेल, तिथून त्या रेशन दुकानांत जातील. वितरणादरम्यान साड्या फाटलेल्या किंवा खराब नसाव्यात, याची विशेष काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर शहरासाठी एकूण ४६,१५० साड्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून, एप्रिल अखेरपर्यंत पात्र महिलांना त्या मिळणे अपेक्षित आहे.

योजनेचा दुहेरी उद्देश
या योजनेद्वारे एका बाजूला राज्यातील अतिशय गरीब कुटुंबांना नवीन वस्त्र भेट देऊन सणासुदीला मदत केली जात आहे, तर दुसऱ्या बाजूला स्थानिक वस्त्रोद्योगाला चालना देऊन विणकरांना रोजगार मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पात्र लाभार्थ्यांनी आपल्या रेशन दुकानदारांशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!