Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

संतापजनक! शाळेत दाखला घ्यायला आलेल्या मुलीचा शिपायाकडून विनयभंग; कर्वेनगरमधील नामांकित शाळेतील घटना

संतापजनक! शाळेत दाखला घ्यायला आलेल्या मुलीचा शिपायाकडून विनयभंग; कर्वेनगरमधील नामांकित शाळेतील घटना

वारजे: कर्वेनगरमधील नामांकित मुलींच्या शाळेत शिपायाकडून एकीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेला संपूर्ण राज्य विसरलेले नसताना पूण्यात तरूण मुलीसोबतची ही घटना समोर आली आहे. दाखला घ्यायला मुलगी आली होती. त्या मुलीशी ओळख वाढवून शिपायाने तिला अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग केला. त्याबद्दल शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल बावधने असे गुन्हा दाखल कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो कोथरूड इथला रहिवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पिडीत तरूणी २१ वर्षीय आहे. ती तिचा दाखला घेण्यासाठी शाळेत आली होती. त्यावेळेस मुख्याध्यापिका उपलब्ध नसल्याने त्यांची सही राहिली होती. त्यावेळी बावधने याने मुलीचा नंबर घेतला होता व दाखला झाल्यावर कळवितो असे सांगितले होते. त्यानंतर तिला वारंवार मेसेज पाठवून तिला त्रास दिला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई होत असल्याचे कारण देत पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील मराठे यांच्या नेतृत्वाखाली कर्वेनगर चौकी व शाळेच्या गेटसमोर आंदोलन केले. विशेष म्हणजे कार्यकर्ते यांनी आंदोलन केल्यानंतर मुख्याध्यापकांनी त्यांना दाद दिली नाही व सुरक्षारक्षकांकडून गेट बंद केले, शिपायाला शाळेच्या मागच्या गेटमधून बाहेर पाठवून दिले. पोलिस शाळेत आल्यानंतर शिपाई शाळेत नव्हता अशी माहिती मराठे यांनी दिली.

दरम्यान बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी बावधने यास अटक केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रामदास भरसठ करीत आहे. याबाबत मुख्याध्यापिका आशा कांबळे यांना विचारले असता, हे प्रकरण नक्की काय आहे याची मला माहिती नाही, शिपायाने काय केले याबाबतही मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली, संस्थेच्या सचिवांनी मात्र संबंधित शिपायाला निलंबित केले असून त्याच्यावर कारवाई करू आणि शाळेत असे प्रकार होणार नाही याबाबत बैठक घेऊन सक्त सूचना देऊ असे सांगितले.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!