Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: मातृत्वाला काळिमा! प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या 6 वर्षांच्या चिमुरड्याचा आईनेच संपवलं; खेड तालुक्यातील धक्कादायक घटना

Pune Crime: मातृत्वाला काळिमा! प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या 6 वर्षांच्या चिमुरड्याचा आईनेच संपवलं; खेड तालुक्यातील धक्कादायक घटना

Pune Crime: अनैतिक संबंधांच्या मोहात पडलेल्या एका मातेने आपल्या पोटच्या ६ वर्षांच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने जीव घेतल्याची अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील कुरुळी (ता. खेड) येथे ही क्रूर घटना घडली असून, आरोपी महिलेने खुनाचा बनाव रचून गुन्ह्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे हे हत्याकांड उघडकीस आले.

बाथरूममध्ये दिला मृत्यूचा ठका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवेज मेहबूब शेख (वय ६) असे मृत मुलाचे नाव आहे. आरोपी बसरीन मेहबूब शेख हिचे राम विनायक कजेवाड याच्याशी प्रेमसंबंध होते. या संबंधांमध्ये अवेज अडथळा ठरत असल्याने त्यांनी त्याला संपवण्याचा कट रचला. ४ एप्रिलच्या रात्री अवेजला बाथरूममध्ये नेऊन बादलीतील पाण्यात त्याचे तोंड दाबून आणि डोके भिंतीवर आपटून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.

हृदयविकाराचा बनाव अन् उघड झालेलं बिंग
हत्येनंतर आरोपी महिलेने अवेजचा मृतदेह बीड जिल्ह्यातील धर्मापुरी या मूळ गावी नेला. तिथे तिने मुलाचा मृत्यू ‘हृदयविकाराच्या झटक्याने’ झाल्याची खोटी माहिती नातेवाईकांना दिली. मात्र, मुलाच्या शरीरावरील खुणा पाहून नातेवाईकांना संशय आला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. शवविच्छेदन अहवालात अवेजचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी खाक्या दाखवताच बसरीनने आपला गुन्हा कबूल केला.

आरोपीला कोठडी, प्रियकर फरार
या प्रकरणी पोलिसांनी बसरीन शेख हिला अटक केली असून न्यायालयाने तिला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आणि बसरीनचा प्रियकर राम कजेवाड हा सध्या फरार असून पोलीस त्याचे शोध घेत आहेत. दक्षिण महाळुंगे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या घटनेमुळे खेड तालुक्यासह बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!