Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सरकारला आली जाग; सरकारी विमानांच्या मेंटेनन्ससाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सरकारला आली जाग; सरकारी विमानांच्या मेंटेनन्ससाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

VIP Flight Security : बारामतीमधील भीषण विमान अपघाताने केवळ पवार कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राज्य सरकारने ‘व्हीआयपी’ प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानांच्या तांत्रिक सुरक्षेचा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला आहे. सरकारी हवाई ताफ्याची डागडुजी आणि आधुनिकीकरण करण्यासाठी महायुती सरकारने तब्बल ६ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला असून, त्याबाबतचा शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे.

सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारची तातडीची कृती
अजित पवारांच्या विमानाला झालेल्या अपघाताने सरकारी ताफ्यातील यंत्रसामग्रीच्या दर्जावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर, प्रलंबित असलेले सुरक्षेचे प्रस्ताव मार्गी लावण्यात आले आहेत. अर्थ विभागाने प्रत्येकी ३ कोटी रुपयांच्या दोन वेगवेगळ्या पुरवणी मागण्यांना हिरवा कंदील दिला आहे. या माध्यमातून विमानांची तांत्रिक दुरुस्ती आणि सुटे भाग खरेदी करण्यातील आर्थिक अडथळे दूर झाले आहेत.

डिसेंबरमधील प्रस्तावाला आता ‘अनिवार्य’ गती
विशेष म्हणजे, या निधीची मागणी डिसेंबर २०२५ च्या हिवाळी अधिवेशनातच करण्यात आली होती. मात्र, अजित पवारांच्या दुर्दैवी अपघातानंतर वित्त विभागाच्या ‘व्यय अग्रक्रम समिती’ने या फाईलवर तातडीने शिक्कामोर्तब केले. हा संपूर्ण खर्च ‘अनिवार्य’ गटात टाकण्यात आला असून, चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) ही कामे पूर्ण करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.

युद्धपातळीवर देखभाल-दुरुस्ती
भविष्यात तांत्रिक दोषांमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि प्रवाशांची सुरक्षा अबाधित राहावी, हा या निर्णयाचा मुख्य गाभा आहे. अजित पवारांच्या निधनानंतर सरकारी हवाई ताफ्याच्या देखभालीकडे आता प्रशासन ‘मिशन मोड’वर लक्ष देणार असून, तांत्रिक त्रुटी दूर करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!