Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Municipal Corporation: पुण्यात सत्तेसाठी भाजपचा मोठा डाव; गणेश बिडकर यांच्याकडे सोपवली गटनेते पदाची धूरा

Pune Municipal Corporation: पुण्यात सत्तेसाठी भाजपचा मोठा डाव; गणेश बिडकर यांच्याकडे सोपवली गटनेते पदाची धूरा

Pune Municipal Corporation: पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) भाजपच्या (BJP) गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक व महानगरपालिका निवडणुकीचे प्रमुख राहिलेले गणेश मधुकर बीडकर (Ganesh Bidkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पुणे शहरप्रमुख धीरज घाटे यांना तसे पत्र दिले आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळविले आहे. भाजपचे सर्वाधिक 119 नगरसेवक विजयी झाले आहेत. ज्येष्ठ नगरसेवक गणेश बीडकर हे भाजपचे निवडणूक प्रमुख होते. आता त्यांची गटनेतेपदी निवड झाली आहे. ते शहरातील ज्येष्ठ नगरसेवक व भारतीय जनता पार्टीमधील शहरातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. ते 2002 पासून महानगरपालिकेत निवडून येतात.

भाजपासाठी प्रतिकूल मानल्या जाणाऱ्या मतदारसंघात काँग्रेसच्या गटनेत्यास व पुण्याच्या तत्कालीन महापौरांना पराभूत केले होते. पूर्व पुण्यात भाजपचा प्रभाव वाढवण्यात महत्त्वाची भूमिका त्यांची आहे. गेल्या ३० वर्षांपासून पक्ष संघटनेत सक्रिय असून, प्रभाग पातळीपासून शहर पातळीपर्यंत विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.

भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या ‘जनादेश यात्रा’ची प्रमुख जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. गणेश बीडकर यांचे वडील स्वर्गीय मधुकरराव बीडकर हे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक व स्थायी समितीचे अध्यक्ष होते.

भूषविलेली महत्त्वाची पदे

2009-2010 अध्यक्ष, कसबा पेठ प्रभाग समिती

2010 –2011 : अध्यक्ष, शहर सुधारणा समिती

2011 – 2012 : अध्यक्ष, स्थायी समिती

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!