Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sachin Ghaiwal: निलेश घायवळनंतर आता भाऊ सचिन घायवळ पुणे पोलिसांच्या रडारवर; मोक्काअंतर्गत कारवाईच्या तयारीत

Sachin Ghaiwal: निलेश घायवळनंतर आता भाऊ सचिन घायवळ पुणे पोलिसांच्या रडारवर; मोक्काअंतर्गत कारवाईच्या तयारीत

पुणे: कुख्यात गुंड घायवळ भावांमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. निलेश घायवळनंतर त्याचा भाऊ सचिन घायवळ हा पुणे पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. सध्या पोलीस सचिन घायवळची तपासणी करतायत. त्याच्याविरोधात मोक्का लावण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरु केल्याची माहिती आहे. निलेश घायवळ याच्याविरोधात आधीच मोक्का लावण्यात आला होता. निलेश हा फरार असून त्यांचे शेवटचे लोकेशन हे लंडन येथे आढळले असल्याचे पोलिसांनी सांगितले. निलेशच्या विरोधात लुक आऊट नोटीस काढण्यात आली आहे.

गुंड सचिन घायवळ याला शस्त्र परवाना कुणी दिला, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. कोणता राजकारणी त्याला पाठबळ देत आहे. याचा तपास सुरु आहे. संशयांची सुई सर्वच बड्या नेत्यांवर आहे. लवकरच या गोष्टीवरून पडदा उटेल. दुसरीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना या प्रकरणावरुन विरोधकांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. योगेश कदमांनी कुणाच्या सांगण्यावरुन सचिन घायवळला हा बंदुकीचा परवाना दिला, याबाबतचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सचिन घायवळ याला योगेश कदम यांच्या शिफारसीने शस्त्र परवाना दिल्याची माहिती समोर आल्यानंतर योगेश कदम यांनी स्पष्टीकरण देताना सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते, असं म्हणत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

या प्रकरणी एका व्यावसायिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात सचिन घायवळ याच्याविरोधात तक्रार दाखल केली. ही घटना २०२२ ते २०२३ दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. कोथरूडमधील एका इमारतीचे बांधकाम तक्रारदार करत होते. त्यावेळी आरोपी नीलेश व त्याच्या साथीदारांनी तेथे येऊन त्यांना धमकावले. नीलेश घायवळच्या परवानगीशिवाय येथे कोणतेही काम होऊ शकत नाही,’ असे सांगून त्यांनी बांधकाम थांबवले आणि नंतर सदनिका देण्याची मागणी केली. तक्रारदारांनी त्यावेळी पोलिसांत दाद मागितली नव्हती.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!