Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mulshi Voter List Controversy : मुळशीत ‘मत’ नव्हे मतदारच चोरीला! 988 मतदारांची नावे कोथरुड भागामध्ये समाविष्ट, उद्धव ठाकरे गट आक्रमक

Mulshi Voter List Controversy : मुळशीत ‘मत’ नव्हे मतदारच चोरीला! 988 मतदारांची नावे कोथरुड भागामध्ये समाविष्ट, उद्धव ठाकरे गट आक्रमक

पुणे: राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपासून मत चोरीचा मुद्दा जोर लावून धरला होा. त्यातूत्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मत चोरीच्या मुद्यावर राजकीय पक्ष सावध होत असताना मुळशी तालुक्यातील धरणग्रस्त भागातील मतदारच चोरल्याच प्रकार उघडकीस आला आहे. मुळशी धरणग्रस्त भागातील तब्बल 988 मतदारांची नावे मतदार यादीतून गायब करण्यात आली.

या मतदारांच्या नावाचा समावेश कोथरुड भागामध्ये नवीन मतदार म्हणून करण्यात आला. मतदारांची नावे परस्पर कोथरुडमध्ये समावेश केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रचंड आक्रमक झाला. त्यांनी तहसीलदारांना निवेदन देत थेट आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. धरणग्रस्त भागातील मतदार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मतदार समजला जातो.

शिवसेनेत फूट पडली त्यावेळी धरणग्रस्त भागातील शिवसैनिक ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिला. ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या आधी ठाकरेंच्या काही पदाधिकाऱ्यांकडून मतदार यादी चेक करत असताना आपल्या भागातील मतदारांची नावे गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही बाब तालुक्यातील वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातली.

कार्यकत्यांनी सखोल माहिती घेतली असता 988 मतदारांची नावेच गावातून गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गायब झालेल्या नावांमध्ये वांद्रे आणि आदरवाडीतील प्रत्येकी १०९, बार्पे 91, वडगाव 50, वाघवाडी 15, ताम्हिणी 44, ढोकळवाडी 35 मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे गावामधील मतदार चोरणार कोथरुडमधील कार्यकर्ता नक्की कोण याचा शोध घेण्याची देखील मागणी होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!