Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nobel Peace Prize 2025: डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वप्न भंगले! ‘या’ धाडसी महिलेला मिळाला यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार

Nobel Peace Prize 2025: डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वप्न भंगले! ‘या’ धाडसी महिलेला मिळाला यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार

Nobel Peace Prize Winner: यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना हा शांतता पुरस्कार देण्यात आला आहे. या वर्षीच्या नोबेल पुरस्कारासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना अनेक देशांनी नामांकित केले होते. परंतु, त्यांचे स्वप्न भंगले आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीचे जॉर्गेन वॅटनर फ्रायडनेस यांनी म्हटले की, जेव्हा हुकूमशहा सत्ता हस्तगत करतात, तेव्हा लोकशाहीच्या अधिकारांसाठी उभे राहणाऱ्या धाडसी व्यक्तींना ओळखणे आवश्यक असते. समितीने विशेषतः व्हेनेझुएलाच्या परिस्थितीकडे लक्ष केंद्रित केले असून, मचाडो यांच्या संघर्षाचे कौतुक केले.

कोण आहेत मारिया कोरिना मचाडो?

मारिया कोरिना मचाडो या व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षातील प्रमुख नेत्या आहेत. त्यांनी २० वर्षांहून अधिक काळ मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी लढा दिला. त्यांनी विरोधकांना एकत्र आणून लोकशाही आणि शांततापूर्ण संक्रमण सुनिश्चित केले. फ्रायडनेस यांनी मचाडो यांना ‘शांततेचे धाडसी आणि वचनबद्ध चॅम्पियन’ म्हटले. व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण संक्रमणासाठी मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हेही वाचा – डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे भारताला 1300 कोटींचा फटका बसणार; उद्योग विश्वात खळबळ

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःसाठी नोबेल शांतता पुरस्काराची मागणी केली होती. त्यांनी भारत-पाकिस्तान युद्धासह जागतिक संघर्ष सोडवण्यास मदत केल्याचा दावा केला होता. इस्रायल, थायलंड, कंबोडिया, अझरबैजान, आर्मेनिया आणि पाकिस्तानसह अनेक राष्ट्रांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला, परंतु 2025 चा पुरस्कार ट्रम्प यांना मिळाला नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!