Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Air Canada Plane Accident: न्यूयॉर्कच्या विमानतळावर एअर कॅनडा एक्सप्रेसचा अपघात; विमानाचा पुढचा भाग चक्काचूर, अनेक प्रवासी…

Air Canada Plane Accident: न्यूयॉर्कच्या विमानतळावर एअर कॅनडा एक्सप्रेसचा अपघात; विमानाचा पुढचा भाग चक्काचूर, अनेक प्रवासी…

Air Canada Plane Accident: अमेरिकेतील सर्वात व्यस्त असलेल्या ला गार्डिया (LGA) विमानतळावर रविवारी रात्री एक थरारक आणि भीषण अपघात घडला. एअर कॅनडा एक्सप्रेसच्या एका विमानाची धावपट्टीवर उभ्या असलेल्या अग्निशमन दलाच्या ट्रकला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात विमानाचा पुढचा भाग (नोज) आणि कॉकपिट पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, दुर्दैवाने दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने या घटनेला ‘मोठ्या प्रमाणावर जीवितहानीची शक्यता असलेली घटना’ (Mass Casualty Incident) म्हणून घोषित केले आहे.

विमानाचा पुढचा भाग झाला चक्काचूर
अपघातग्रस्त विमान एअर कॅनडा एक्सप्रेसचे CRJ-900 असून त्यामध्ये सुमारे १०० प्रवासी होते. लँडिंगनंतर धावपट्टीवर टॅक्सी करत असताना या विमानाची धडक पोर्ट अथॉरिटीच्या अग्निशमन दलाच्या ट्रकला बसली. ही धडक इतकी भीषण होती की विमानाचे कॉकपिट आणि समोरील भाग अक्षरशः चिरडला गेला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये विमानाची दुरवस्था स्पष्टपणे दिसत असून, यामुळेच दोन्ही वैमानिकांना आपले प्राण गमवावे लागले.

७० हून अधिक जण जखमी; मदतकार्य युद्धपातळीवर
प्राथमिक माहितीनुसार, ज्या ट्रकला विमानाने धडक दिली, त्यामध्ये ५ आपत्कालीन प्रतिसादक (अग्निशामक) होते; त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. विमानातून प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले असले तरी, ७० हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने न्यू यॉर्कमधील जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

विमानतळ बंद; उड्डाणे JFK कडे वळवली
या भीषण दुर्घटनेनंतर ला गार्डिया विमानतळ पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. विमानतळ प्रशासनाने सर्व ‘इनकमिंग फ्लाईट्स’ थांबवल्या असून, न्यू यॉर्कला येणारी विमाने आता JFK विमानतळाकडे वळवण्यात येत आहेत. न्यू यॉर्क पोलीस विभाग (NYPD) आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. रात्री ११:३८ च्या सुमारास या अपघाताची पहिली वर्दी मिळाल्याचे अग्निशमन दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.

एअर कॅनडाचे अधिकृत निवेदन
या धक्कादायक घटनेनंतर एअर कॅनडाने अधिकृत निवेदन जारी केले आहे. “आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. बाधित प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे,” असे कंपनीने म्हटले आहे. २०२५ मध्येही या विमानतळावर टॅक्सीवेवर काही किरकोळ घटना घडल्या होत्या, मात्र यावेळचा अपघात अत्यंत भीषण आहे. ला गार्डिया विमानतळाच्या धावपट्ट्यांची रचना आणि सुरक्षेबाबत आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!