Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कार्तिकी एकादशीपूर्वी आळंदीतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

कार्तिकी एकादशीपूर्वी आळंदीतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

पुणे: कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या वार्षिक यात्रेदरम्यान लाखो वारकऱ्यांचा ओघ लक्षात घेता, शिंदे यांनी आळंदी नगरपरिषदेला सर्व रस्त्यांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

रविवारी आळंदी भेटीदरम्यान शिंदे यांनी नगरविकास विभागाकडून रस्ते दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी १ कोटी रुपयांचे तातडीचे अनुदान जाहीर केले. काम वेळेत पूर्ण व्हावे आणि प्रत्येक दुरुस्त रस्त्याचे फोटो नोंदीसाठी सादर करावेत, अशा सूचना त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिल्या. उपमुख्यमंत्री शिंदे हे या दौऱ्यात नवीन भक्त निवास प्रकल्पाची पायाभरणी करण्यासाठी आळंदीत आले होते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. यापूर्वी शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सरकारने भक्त निवासासाठी २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

हेही वाचा – दिवाळी स्वच्छता मोहिमेत पुणेकरांचा सहभाग; 4 दिवसांत PMC ने गोळा केला तब्बल २,६०० मेट्रिक टन कचरा!

यासोबतच शिंदे यांनी आळंदी घाट परिसरातील सुशोभीकरण आणि स्वच्छता प्रकल्पांचे उद्घाटन केले. भाविकांच्या सोयीसाठी इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी राज्य सरकारकडून विशेष प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सविस्तर अहवाल तयार केला जात आहे. नदीकाठी सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे (STP) उभारली जातील, ज्यामुळे भाविक निर्भयपणे पवित्र स्नान करू शकतील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. नगरपरिषदेने आता यात्रेपूर्वी रस्त्यांच्या कामाचा वेग वाढवण्याचे नियोजन केले असून, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या कार्तिकी एकादशीपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!