Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

NCP: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात लावणी; नागपूरातील व्हिडीओ व्हायरल

NCP: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात लावणी; नागपूरातील व्हिडीओ व्हायरल

NCP Ajit Pawar, Nagpur Office Lavani: सर्वसामान्य नागरिक समस्या सोडवण्यासाठी पक्ष कार्यालयात नागरिक जातात आणि आपल्या समस्या सांगतात. मात्र पक्ष कार्यालयातून चक्क लावणी सादर झाल्याचा व्हिडीओ समोर आल्यास एखादा कपाळाला हात लावेल. अशीच घटना नागपूरमधून समोर आली आहे. पक्षाच्या उपक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नागपूर कार्यालयातून ही घटना समोर आली आहे. याकार्यालयाचे उद्घाटन अवघ्या दोन महिन्यापूर्वी अजित पवार यांच्याच हस्ते झाले होते. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि जनसंपर्कासह पक्ष वाढवण्याबाबतचे उपक्रम हे या कार्यालयात अपेक्षित होते. परंतु या कार्यालयात चक्क दिवाळी मिलन कार्यक्रमात महिला कार्यकर्त्यांनी ठुमके लावत लावणी सादर केली.

सर्वसामान्य नागरिकांना वेळ किती झाली हे घड्याळ बघून कळते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह घड्याळ आहे. परंतु अजित पवार यांच्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी नागपुरातील अधिकृत पक्ष कार्यालयात दिवाळी मिलनच्या नावाखाली ‘वाजले की बारा.. आता जाऊ द्या की घरी’ ही लावणी जोरदारपणे सादर केली.

पक्ष कार्यालयात सादर केलेल्या या लावणीला तिथे उपस्थित असलेले शहर अध्यक्ष इतर पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात आणि जोरदार शिट्ट्या वाजवत दादही दिली. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यावर पक्षाच्या उपक्रमावर प्रश्न उपस्थित झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नागपुरातील मुख्य कार्यालय गणेश पेठ परिसरात असून अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच अजितदादांनी या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. त्याच कार्यालयातील मुख्य हॉलमध्ये रविवारी पक्षाचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी कार्यकर्त्यांसाठी दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यात जोरदार नृत्यांचाही कार्यक्रम पार पडला.

अनेकांनी त्यांची कला सादर केली. यावेळी मराठीच्या अत्यंत गाजलेल्या लावण्या ‘वाजले की बारा’ आणि ‘मला इश्काच्या झुल्यात झुलवा’ सुद्धा त्या ठिकाणी सादर करण्यात आल्या. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि विदर्भातील प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल यांच्या भव्य दिव्य पोस्टर समोरच सादर केलेली ‘वाजले की बारा आता जाऊ द्याना घरी..’ ही लावणी सर्वांचे लक्ष वेधून गेली.

शहराध्यक्ष म्हणतात कला सादर करण्यात गैर काय..

प्रसिद्धी माध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांचे मत जाणून घेतले. अहिरकर म्हणाले, दिवाळीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना त्यांची कला मोकळेपणाने सर्वांसमोर सादर करता येईल यासाठी ही खास संधी दिली. पक्ष कार्यालयात लावणी सादर करण्यात काहीही गैर नाही. लावणी सादर करणारी महिला पक्षाची पदाधिकारी असल्याचा दावाही अहिरकर यांनी केला.

 

दरम्यान सोशल मीडियावर सध्या राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयातील वाजले की बारा ही लावणी चांगलीच वायरल होत असून पक्ष कार्यालयातील ही लावणी मतदारांमध्ये पक्षाचे बारा वाजवते की काय अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!