Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Anjali Damania News: अंजली दमानियांची आजित पवारांवर बोचरी टीका; म्हणाल्या, ‘राज्यावर 9 लाख कोटींच कर्ज अन् अर्थमंत्री मात्र दहावी पास…’

Anjali Damania News: अंजली दमानियांची आजित पवारांवर बोचरी टीका; म्हणाल्या, ‘राज्यावर 9 लाख कोटींच कर्ज अन् अर्थमंत्री मात्र दहावी पास…’

Pune News: महाराष्ट्र कर्जामध्ये बुडाला असून सव्वा नऊ लाख कोटींचं कर्ज आहे. मात्र उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांना याबाबत काहीच कळत नाही, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. महाराष्ट्र स्वित्झर्लंडपेक्षा मोठा असून अर्थमंत्री मात्र दहावी पास आहेत, असे दमानिया म्हणाल्या.

राज्याची आर्थिक परिस्थीती अजित पवारांना सांभाळता येत नसल्याच त्यांनी त्यांच्या बोलण्यातून व्यक्त केलं. आपले सध्याचे अर्थमंत्री दहावी पास असून त्यांना काहीच कळत नाही. असेट काय आहेत लायबिलिटीज काय आहेत, एवढे नऊ लाख कोटी आपण आणार कुठे आहोत? यासाठी अजित पवार यांच्याकडे वेळ नाही अथवा त्यांना कळतही नसेल, असं म्हणत अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली.

दमानिया म्हणाल्या, मी राज्याच्या अर्थमंत्र्यांबद्दल बोलत असून महाराष्ट्र हा स्वित्झर्लंड देशा इतका मोठा आहे. महाराष्ट्र हे एका स्वित्झर्लंड देशा एवढं मोठं राज्य असताना त्याचे जे अर्थमंत्री आहेत ते दहावी पास आहेत. मला त्यांच्या शिक्षणावरती टीका करायची आहे असं नाही. मात्र अर्थकारण त्यांना कळतं का? हा मूळ प्रश्न असल्याचा अंजली दमानिया म्हणाल्या.

मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली की, त्यानंतर मला असा प्रश्न पडला की, ती लोकं आता खाणार काय? परिस्थिती पाहिल्यानंतर त्यानंतर आपल्या परीने जमेल तेवढी आम्ही मदत केली. मात्र सध्याच्या सरकारकडे फक्त मतं फोडण्यासाठी पैसा आहे. पक्ष फोडण्यासाठी पैसा आहे. मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा नाही, अशी टीका अंजली दमानिया यांनी महाराष्ट्र सरकारवर केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!