Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bee Attack: राजगड किल्ल्यावर मधमाश्यांचा हल्ला; 3 दिवसांत 15 पर्यटक जखमी, वन विभाग सतर्क

Bee Attack: राजगड किल्ल्यावर मधमाश्यांचा हल्ला; 3 दिवसांत 15 पर्यटक जखमी, वन विभाग सतर्क

Bee attack on Rajgad Fort: ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर गेल्या तीन दिवसांत मधमाश्यांच्या हल्ल्यांनी पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुवेळा माची परिसरात घडलेल्या या घटनांमध्ये आतापर्यंत 10 ते 15 पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. स्थानिक वारसा रक्षकांच्या माहितीनुसार, हे हल्ले प्रामुख्याने सकाळच्या सत्रात होत आहेत. ट्रेकिंगसाठी आलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाश्यांचे थवे तुटून पडतात. जखमींना चेहरा, हात आणि पाय या उघड भागांवर दंश झाला असून, काहींना वैद्यकीय उपचारांची गरज भासली आहे. सुदैवाने, सर्वजण धोक्याबाहेर आहेत.

किल्ल्याच्या परिसरातील खडक आणि भिंतींमध्ये अनेक भेगा, पोकळ्या असल्याने मधमाश्यांनी तेथे मोठ्या प्रमाणात पोळे बांधल्याचे दिसून येते. अलीकडच्या पावसामुळे माशा अधिक आक्रमक झाल्या असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पर्यावरण आणि वारसा रक्षकांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून मधमाश्यांच्या पोळ्यांचे वैज्ञानिक पद्धतीने स्थलांतर करण्याच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

हेही वाचा – पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी PMC पाषाण ते मुंबई-बेंगळुरू बायपासपर्यंत ग्रेड सेपरेटर बांधणार

राजगड किल्ला हा ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी लोकप्रिय पर्यटन स्थळ असून, दर आठवड्याला शेकडो पर्यटक येथे भेट देतात. त्यामुळे वारंवार होणाऱ्या मधमाश्यांच्या हल्ल्यांमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!