Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BEST Bus Accident: ऐरोली पुलावर बेस्ट बस आणि टेम्पोची धडक; 7 जण जखमी

BEST Bus Accident: ऐरोली पुलावर बेस्ट बस आणि टेम्पोची धडक; 7 जण जखमी

BEST Bus Accident: नवी मुंबईतील वसंतराव नाईक मार्गावरील भांडुप पंपिंग सिग्नलजवळ गुरुवारी सकाळी सुमारे ६:४५ वाजता बेस्ट बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात सात प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी दोन गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकृत माहितीनुसार, ठाणे-मजस डेपो मार्गावर जाणारी बेस्ट बस मजस डेपोकडे जात असताना, भांडुपहून वाशीकडे जाणाऱ्या टेम्पोने (MH 03 CV 8123) सिग्नल क्रॉसिंगवर जोरदार धडक दिली. धडकेमुळे दोन्ही वाहनांतील प्रवासी जखमी झाले.

प्राप्त माहितीनुसार, बसमधील दोन आणि टेम्पोमधील पाच प्रवासी जखमी झाले. त्यापैकी बस प्रवासी सागर राजाराम जाधव (३०) आणि टेम्पो प्रवासी दुर्गादास नागेश देवकर (५४) हे गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांना मुलुंड (पूर्व) येथील वीर सावरकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उर्वरित जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचार देण्यात आले आणि वैद्यकीय मदतीनंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. बस प्रवासी आनंदकुमार साईराम शर्मा (६४) यांना प्राथमिक उपचारानंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. त्याचप्रमाणे टेम्पो प्रवासी राजेश कुमार मिठाईलाल जयस्वाल (५४), गुलाब चिनीलाल जयस्वाल (७२), संजय श्यामलाल जयस्वाल (३७) आणि रमेश बेचनलाल गुप्ता (३४) (टेम्पो चालक) यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

हेही वाचा – लोणी काळभोर भागात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृ्त्यू; एकात पादचाऱ्याने तर, दुसऱ्यात दुचाकीस्वाराने जीव मगावला

बस चालकावर गुन्हा दाखल

अपघातानंतर बस चालक संतोष पाटील याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२५, १२५(अ), १२५(ब), आणि २८१, तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर बेपर्वा आणि निष्काळजीपणे वाहन चालवण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा आणखी तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!