Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Gangotri Dham : मोठी बातमी! गंगोत्री धाममध्ये आता गैर-हिंदूंना नो एन्ट्री; ‘या’ कारणामुळे घेण्यात आला निर्णय

Gangotri Dham : मोठी बातमी! गंगोत्री धाममध्ये आता गैर-हिंदूंना नो एन्ट्री; ‘या’ कारणामुळे घेण्यात आला निर्णय

Gangotri Dham : उत्तराखंडमधील चार धामांपैकी एक असलेल्या गंगोत्री धाममध्ये आता गैर-हिंदूंना प्रवेश बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. श्री गंगोत्री मंदिर समितीने रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेतला. विशेष म्हणजे, ही बंदी केवळ मुख्य गंगोत्री मंदिरापुरती मर्यादित नसून, आई गंगेचे हिवाळी निवासस्थान असलेल्या मुखबा गावातही हा नियम कडकपणे लागू केला जाणार आहे.

मंदिर समितीचा एकमताने निर्णय
श्री गंगोत्री मंदिर समितीचे अध्यक्ष सुरेश सेमवाल यांनी या निर्णयाची घोषणा केली. मंदिर समितीच्या मते, “देवभूमीची पवित्रता आणि धार्मिक परंपरांचे रक्षण करणे” हे या निर्णयामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. सध्या हिवाळ्यामुळे गंगोत्री धामचे दरवाजे बंद असून, माता गंगेची उत्सव मूर्ती मुखबा येथे वास्तव्यास आहे. त्यामुळे आतापासूनच मुखबा येथेही गैर-हिंदूंच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी असेल.

बद्रीनाथ आणि केदारनाथमध्येही लागू होणार नियम?
गंगोत्री मंदिर समितीच्या या निर्णयानंतर आता बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांबाबतही हालचाली सुरू झाल्या आहेत. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे (BKTC) अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी स्पष्ट केले की, समितीच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व ४५ मंदिरांमध्ये गैर-हिंदूंना प्रवेश बंदी घालण्याचा प्रस्ताव आगामी बोर्ड बैठकीत मांडला जाईल. हिंदू धर्मातील या पवित्र स्थळांची प्रतिमा मलीन करणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

भाविकांसाठी नवीन ‘यात्रा’ तारखा जाहीर

या वादाच्या पार्श्वभूमीवर, २०२६ च्या आगामी यात्रा हंगामासाठी मंदिरांचे दरवाजे उघडण्याच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत:

  • गंगोत्री आणि यमुनोत्री: १९ एप्रिल २०२६ (अक्षय तृतीया).
  • बद्रीनाथ धाम: २३ एप्रिल २०२६.
  • केदारनाथ धाम: महाशिवरात्रीला तारखेची घोषणा होईल.

हरिद्वारमध्येही कडक पाऊल
केवळ चार धामच नव्हे, तर हरिद्वारमधील हर की पौडी आणि आसपासच्या १०५ घाटांवरही गैर-हिंदूंना प्रवेश बंदी घालण्याची मागणी ‘श्री गंगा सभा’ आणि स्थानिक साधू-संतांनी केली आहे. उत्तराखंड सरकार या प्रस्तावाचा गंभीरपणे विचार करत असून, २०२७ च्या ‘अर्ध कुंभ’ मेळ्यापूर्वी हा नियम लागू होण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!