Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok Kharat: नाशिक हादरले! ‘कॅप्टन’ खरातचा भोंदूगिरीचा बुरखा फाटला; प्रसादातून गुंगी देऊन महिलांचे लैंगिक शोषण

Ashok Kharat: नाशिक हादरले! ‘कॅप्टन’ खरातचा भोंदूगिरीचा बुरखा फाटला; प्रसादातून गुंगी देऊन महिलांचे लैंगिक शोषण

Ashok Kharat: नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात ‘ओकस प्रॉपर्टीज’च्या नावाने कार्यालय चालवणारा अशोक खरात हा अंकशास्त्र आणि तंत्र-मंत्राचा वापर करून लोकांना जाळ्यात ओढत असे. २०१९ मध्ये, २८ वर्षीय पीडित तरुणीचे लग्न जुळत नसल्याने तिच्या नातेवाईकांनी खरातची भेट घेतली होती. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा बनाव रचून खरातने या कुटुंबाचा विश्वास संपादन केला. लग्न जमवून देण्याच्या नावाखाली त्याने पीडितेला महागडे ‘रत्न’ परिधान करण्यास भाग पाडले आणि विधींच्या बहाण्याने मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले.

भयाचा सापळा आणि पाशवी अत्याचार
खरातने पीडितेच्या मनात विधींविषयी प्रचंड भीती निर्माण केली होती. “खडा काढल्यास लग्न मोडेल” किंवा “विधी न केल्यास पतीचा जीव जाईल,” अशा धमक्या देऊन त्याने तिला मानसिक गुलाम बनवले. २०२२ मध्ये प्रसादातून गुंगीचे औषध देऊन त्याने पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे, २०२३ मध्ये पीडितेच्या पतीला कार्यालयाबाहेर बसवून खरातने आतमध्ये तिचे लैंगिक शोषण केले, ज्यामध्ये तिला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्रावही झाला होता. नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या काळात चारित्र्यहनन करण्याची भीती दाखवून त्याने हे अत्याचाराचे सत्र सुरूच ठेवले.

पोलीस कारवाई आणि डिजिटल पुराव्यांचा उलगडा
१५ मार्च २०२६ रोजी पीडितेने धीर धरून सर्व प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला, त्यानंतर १७ मार्चला सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ‘तृप्तबाला’ बंगल्यावर छापा टाकून खरातला अटक केली. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती एक पेनड्राईव्ह लागला असून, त्यातील आक्षेपार्ह व्हिडिओंवरून खरातने इतरही अनेक महिलांचे शोषण केल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

बड्या हस्तींशी संबंध आणि तपासाची व्याप्ती
अशोक खरातचे संबंध केवळ सामान्य लोकांशीच नव्हे, तर राजकीय नेते, उद्योजक आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशीही असल्याचे तपासात समोर येत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) मते, अनेक उच्चशिक्षित महिलाही त्याच्या या छुप्या जाळ्यात अडकल्या असण्याची भीती आहे. न्यायालयाने आरोपीला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!