मुंबई : आदित्य धर यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘धुरंधर २’ सिनेमा आता प्रदर्शित होत आहे. सेन्सॉर बोर्डाने रणवीर सिंगच्या चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र दिले आहे. हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा लांबलचक असणार आहे. त्याचा रनटाइम २२९.६ मिनिटे, म्हणजेच अंदाजे ३ तास ५० मिनिटे आहे.
सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना अनेक कट्स सुचवले आहेत. यामध्ये शिवीगाळ म्यूट करणे, ड्रग्जच्या दृश्यांबाबत चेतावणी देणे आणि हिंसाचार कमी करणे यांचा समावेश आहे. सेन्सॉर बोर्डाने हिंसक दृश्ये काही सेकंदांनी कमी करण्याचे आदेश दिले आहेत. याव्यतिरिक्त, शिवीगाळ म्यूट करणे, सबटायटल्समधील नोटाबंदीची तारीख बदलणे आणि चित्रपटात पंतप्रधान मोदींचा उल्लेख वापरल्याबद्दल अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे, या आदेशांचाही समावेश होता.
सीबीएफसीने ‘धुरंधर २’ मधून १ मिनिट ३४ सेकंदांचे फुटेज कापले आहे. त्याचा अंतिम रनटाईम २२९ मिनिटांचा आहे. सेन्सॉर बोर्डाने एकूण २१ कट्स केले आहेत.
चित्रपटात केलेले प्रमुख बदल
– कंटेंट वॉर्निंग आणि ड्रग्स डिस्क्लेमर स्लाईड्स जोडणे.
– शिवीगाळ आणि काही विशिष्ट शब्द/नावे म्यूट करणे किंवा बदलणे.
– हिंसेची दृश्ये कमी करणे (ज्यात डोक्याला इजा, शिरच्छेद आणि डोळे काढणे यांचा समावेश आहे).
– सबटायटल्सचे संपादन, जसे की चुकीचा मजकूर काढून टाकणे आणि दुरुस्त करणे (उदा. लाहोर ऐवजी दिल्ली करणे).
– बातम्यांचे संदर्भ आणि पंतप्रधानांच्या उल्लेखांसाठी परवानगी घेणे.
– गाण्यांचे सबटायटल्स जोडणे, ज्यात हिंदी चॅप्टर मजकूर आणि अधिकृत शीर्षक फॉरमॅटिंगचा समावेश आहे.


