Today शुक्रवार, 1st मे 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया; हाताला सलाई, पहिला फोटो…

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया; हाताला सलाई, पहिला फोटो…

Chhagan Bhujbal: राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भुजबळ यांची आज (शनिवार, 13 डिसेंबर) मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी रुग्णालयात भेट घेतली.

छगन भुजबळ यांना 28 ऑक्टोबर रोजी नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर भुजबळ यांची प्रकृती कशी आहे, असे विचारले जात होते. आज बाळा नांदगांवकर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी काढलेला एक फोटो त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोत भुजबळ यांच्या हाताला सलाईन लावलेले दिसत असले, तरी त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य कायम आहे.

बाळा नांदगावकर यांची पोस्ट काय?

आपल्या पोस्टमध्ये बाळानांदगावर म्हणतात, मतभेद असावे, मनभेद नसावे. राज्यातील ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ साहेब यांची आज भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली. यावेळी त्यांच्याबरोबर जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिवसैनिक म्हणून काम करत असताना भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते होते. दोघांमधील सारखा दुवा म्हणजे “ठाकरे परिवार”. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यांनी ही मनापासून आनंद व्यक्त केला.

त्यांची आणि माझी राजकीय विचारधारा नंतरच्या काळात वेगळी असली तरी ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याबद्दल मनात आदरच आहे. वयाच्या या टप्प्यात ही त्यांचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे त्यांचा लढवय्या स्वभाव. अनेकदा प्रवाहाविरोधात जाऊन लढणारे भुजबळ साहेब वयाच्या या टप्प्यात ही लढवय्ये आहेत.

बाळासाहेब व एकूणच ठाकरे परिवारातील जुन्या आठवणी, आधीच्या काळातील केलेला संघर्ष त्यातून मिळविलेले यश, राजकारणाची बदलेली शैली याबद्दल ते मनापासून व्यक्त झाले. हॉस्पिटल मध्ये असले आणि शस्त्रक्रिया झाली तरी एकदम मनापासून ते व्यक्त होत होते. आम्ही दोघेही जुन्या गोष्टी आठवून भाऊक झालो.

आपल्या राज्याची संस्कृती आहे की आपल्या इथे राजकीय विरोधक असतात पण दुश्मन नव्हे. कारण राजकारणात मतभेद असावे पण मनभेद नसावे. ही संस्कृती हळूहळू लुप्त होत आहे असे सध्या जाणवते आहे.

राजकारणातील धडधडती तोफ म्हणून ओळखले जाणारे भुजबळ साहेब हे लवकरात लवकर स्वस्थ होऊन परत सक्रीय व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!