Today मंगळवार, 28th एप्रिल 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Heat Wave: उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंनी वाढवली राज्याची चिंता! पाऊस कधी येणार? जाणून घ्या IMD ने दिलेला दिलासादायक संकेत

Maharashtra Heat Wave: उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंनी वाढवली राज्याची चिंता! पाऊस कधी येणार? जाणून घ्या IMD ने दिलेला दिलासादायक संकेत

Maharashtra Heat Wave: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे. दुर्दैवाने, या वाढत्या तापमानामुळे राज्यात दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात या मृत्यूच्या घटना घडल्या असून, नागरिक उन्हाच्या तीव्रतेने अक्षरशः होरपळून निघाले आहेत.

उन्हाच्या झळांनी घेतले दोन बळी

अहिल्यानगर: संगमनेर येथे आपल्या आजारी बहिणीला भेटण्यासाठी दुचाकीवरून आलेल्या दिगंबर वाकचौरे (४५) यांचा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच मृत्यू झाला. कडक उन्हातून प्रवास करून आल्यावर त्यांनी डोक्यावर थंड पाणी ओतले, मात्र उष्माघाताचा तीव्र झटका बसल्याने ते जागीच कोसळले.

जळगाव: एका लग्नकार्यावरून परतलेले लोधू पाटील (६०) यांचा मृतदेह एसटी वर्कशॉपजवळ आढळला. जळगावात तापमान ४४.६ अंशांवर पोहोचल्याने उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.

विदर्भाची स्थिती चिंताजनक
विदर्भात सध्या आगीच्या ज्वाळांसारखे ऊन पडत आहे. विशेष म्हणजे, अकोला शहराने जागतिक स्तरावर उच्चांकी तापमानाची नोंद केली आहे. सोमवारी अमरावतीमध्ये ४६.६°C आणि वर्ध्यात ४६.५°C तापमानाची नोंद झाली. दुपारच्या वेळी रस्ते पूर्णपणे ओस पडत असून नागरिक घरातच थांबणे पसंत करत आहेत.

पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये उकाडा वाढला
पुणे: शहरात पारा ३९.८ अंशांवर असला तरी रात्रीचे तापमान २४.७ अंशांवर गेल्याने पुणेकर घामाघूम झाले आहेत. पुढील काही दिवस दुपारनंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातही उष्णतेची लाट कायम असून शहराचे तापमान ४३°C वर पोहोचले आहे.

हवामान विभागाचा अंदाज: दिलासा मिळणार का?
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४ दिवसांत पुणे आणि परिसरात तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दोन दिवस विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. जोपर्यंत तापमान कमी होत नाही, तोपर्यंत प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळी बाहेर न पडण्याचे आणि भरपूर पाणी पिण्याचे आवाहन केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!