Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार; राज्यात नव्या समीकरणांची चाहूल?

देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार; राज्यात नव्या समीकरणांची चाहूल?

मंगळवेढा: येत्या 26 ऑक्टोबरला मंगळवेढा येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. दोघे पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याने या कार्यक्रमाने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे.

हा भव्य सोहळा भाजपचे पंढरपूर-मंगळवेढा आमदार समाधान अवताडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असून, मनोज जरांगे पाटील यांनाही अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे आणि त्यांनी ते स्विकारले आहे, असे अवताडे यांनी सांगितले. या सोहळ्याला राज्यातील मंत्री, खासदार, आमदार तसेच सर्व पक्षांचे नेते आणि मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहणार आहेत.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय महत्त्व

या कार्यक्रमाचे विशेष महत्त्व असे की, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि जरांगे एका स्टेजवर येत आहेत. पुतळा समितीचे सदस्य कौंडू भैरी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर प्रामाणिक प्रयत्न केले. त्यामुळे जरांगे पाटील यांनीही या सोहळ्यास उपस्थित राहण्यास होकार दिला आहे, असे त्यांनी म्हटले.

हेही वाचा – पंकजा मुंडे वारसदार नाही तर मग कोण? मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा

राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान फडणवीस हे जरांगे यांच्या उपोषणस्थळी गेले नव्हते. ओबीसी समाजाची नाराजी टाळण्यासाठी सरकारने त्या वेळी सावध भूमिका घेतली होती. मात्र, आता दोघे एकाच मंचावर येणार असल्याने नवे समीकरण निर्माण होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व समाजाचे आराध्य दैवत असल्याने या सोहळ्याला सर्वच पक्षांतील नेत्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. 26 ऑक्टोबर रोजी मंगळवेढ्यात फडणवीस आणि जरांगे खरोखरच एकत्र मंचावर दिसतात का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!