Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

गांधी जयंतीच्या दिवशी स्वातंत्र्यसैनिक डॉ. जी. जी. पारिख यांचे निधन

गांधी जयंतीच्या दिवशी स्वातंत्र्यसैनिक डॉ. जी. जी. पारिख यांचे निधन

Dr G G Parikh: स्वातंत्र्यलढ्यातील ज्येष्ठ सैनिक, गांधीवादी विचारांचे पुरस्कर्ते, खादी पुनरुज्जीवनाचे समर्थक आणि वैद्यकीय क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहिलेले डॉ. जी. जी. पारिख यांचे आज पहाटे नाना चौक येथील निवासस्थानी निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. विशेष म्हणजे, त्यांचा अंत 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी झाला.

स्वातंत्र्यसैनिक ते समाजवादी नेता

1942 च्या भारत छोडो आंदोलनात सेंट झेवियर्स कॉलेजमधील विद्यार्थी म्हणून सहभागी होताना त्यांनी अटकेला सामोरे जाणे पसंत केले. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आयुष्यभर अहिंसा, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद यांचे तत्त्व अंगीकारले. खादी, ग्रामोद्योग आणि सहकारी चळवळीला चालना देण्यासाठी त्यांनी 1946 मध्ये मुंबईत केंद्र स्थापन केले.

युसूफ मेहेरअली केंद्राची स्थापना

दरम्यान, 1960 मध्ये त्यांनी पत्नी मंगला पारीख यांच्यासह रायगड जिल्ह्यातील तारागाव येथे युसूफ मेहेरअली केंद्र उभारले. आदिवासी समुदायांच्या सक्षमीकरणासाठी उभारलेल्या या केंद्रातून शिक्षण, आरोग्य आणि उदरनिर्वाह यावर महत्त्वपूर्ण काम झाले. वयाच्या शंव्या दशकातही ते समाजकार्यात सक्रीय होते. ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांनी डी. एन. रोडवरील खादी भांडाराच्या जीर्णोद्धार उपक्रमाचे उद्घाटन केले. खादी ग्रामोद्योग चळवळीसाठी ते अखेरपर्यंत प्रेरणादायी ठरले. मतदानाचा हक्क बजावणे ही त्यांची अखेरपर्यंतची भूमिका होती.

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी शोकसंदेशात म्हटले, गांधी जयंतीच्या दिवशी समाजवाद्यांचा संत आपल्यातून गेला. त्यांनी महात्म्यांचे मूल्य जगले आणि शेवटपर्यंत जपले. डॉ. जी. जी. पारिख हे स्वातंत्र्यसैनिकांच्या अखेरच्या पिढीतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे लेखन, विचार आणि कार्य हीच त्यांची खरी स्मृती ठरणार असून, कठीण काळात राष्ट्राला दिशा दाखवणारा त्यांचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!