Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

हृदयद्रावक! अस्मानी संकटाला कंटाळून बार्शी तालुक्यात एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

हृदयद्रावक! अस्मानी संकटाला कंटाळून बार्शी तालुक्यात एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सोलापूर : सलग मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव आणि ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक गावांना पूरपाणी वेढा घालत असून, हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण आला आहे. या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.

दहिटणे गावातील घटना

दहिटणे गावातील लक्ष्मण काशिनाथ गवसाने (वय 58) हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या दीड एकर कोरडवाहू शेतात सततच्या पावसामुळे पाणी साचले आणि पिके पूर्णपणे नष्ट झाली. त्यातच ते शारीरिक आजाराने त्रस्त होते. मानसिक तणावाखाली 23 सप्टेंबर रोजी ते घरातून बाहेर पडले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील शेतात त्यांनी झाडाला गळफास घेतल्याचे उघडकीस आले.

कारी गावातील घटना

याच दिवशी शरद भागवत गंभीर (वय 45) या शेतकऱ्यानेही आत्महत्या केली. गंभीर यांच्या साडेतीन एकर शेतात पेरू व लिंबाची बाग होती. सलग पावसामुळे बागेचे संपूर्ण नुकसान झाले. त्यांच्यावर बँकेचे सुमारे 7 लाखांचे कर्ज आणि गावकऱ्यांकडून घेतलेले आणखी 3 लाखांचे कर्ज होते. दहा लाखांच्या ओझ्यामुळे आणि शेतीतून उत्पन्नाचा मार्ग बंद झाल्याने त्यांनी गायीला बांधलेल्या दावणाच्या दोरीने गळफास घेतला.

या दोन्ही घटनांची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून झाली असून तपास सुरू आहे. मात्र, या दुर्दैवी घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!